You are currently viewing कोळसा प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा…

कोळसा प्रकरणात माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना ३ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा…

दिल्ली :

 

सीबीआयच्या (CBI) एका विशेष न्यायालयाने आज सोमवारी माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना कोळसा घोटाळ्याशी संबंधित एका प्रकरणात ३ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. हे प्रकरण १९९९ मधील झारखंड कोळसा ब्लॉक वितरणात झालेल्या कथित अनियमीततेशी संबंधित आहे. कोर्टाने या प्रकरणात काही दिवसांपर्वी या प्रकरणाशी संबंधित आणखी दोन आरोपींना तीन वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. या प्रकरणात सीबीआयने माजी केंद्रीय मंत्री दिलीप राय यांना जन्मठेपेच्या शिक्षेची मागणी केली होती. त्यांच्या शिक्षेवरील युक्तीवाद १४ ऑक्टोबर या दिवशी पूर्ण झाला होता.

 

१९९९ मध्ये दिलीप राय हे अटलबिहारी सरकारमध्ये राज्यमंत्री होते. राउज अॅव्हेन्यू कोर्टाचे विशेष न्यायाधीश भरत पराशर यांनी दिलीप राय यांना ६ ऑक्टोबरला दोषी ठरवले होते. या लोकांनी कोळसा ब्लॉकच्या वितरणासाठी केलेल्या खरेदीसंदर्भात एक कट रचला होता. हे प्रकरण १९९९ मध्ये कोळसा मंत्रालयाच्या १४ व्या स्क्रीनिंग समितीद्वारे कॅस्टन टेक्नॉलॉजीज लिमिटेडच्या पक्षात झारखंडच्या गिरिडीह जिल्ह्यात १०५.१५३ हेक्टर गैर-राष्ट्रीयकृत आणि सोडून देण्यात आलेल्या खनन क्षेत्राच्या वाटपाबाबतचे आहे.

 

समाजाला योग्य संदेश देण्याच्या दृष्टीने या दोषींना अधिकाधिक शिक्षा देण्याची आवश्यकता असल्याचे सीबीआयने कोर्टाला सांगितले होते. कोळसा खनन वाटप घोटाळ्यात गुन्हा सिद्ध झालेले हे पहिलेच प्रकरण असून या गुन्ह्यात जास्तीत जास्त जन्मठेपेची शिक्षा आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ सह (लोकसेवकांचा विश्वासघात) विविध कलमांखाली दिलीप राय यांना दोषी धरण्यात आले आहे. ‘आमची वृद्धावस्था लक्षात घेऊन, तसेच पूर्वी कोणत्याही प्रकरणात आम्हाला दोषी ठरवले गेले नसल्याने आमच्याबाबत नरमाईची भूमिका घ्यावी’, अशी विनंती दोषींनी न्यायालयाला केली होती. परंतु न्यायालयाने ती फेटाळली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

1 + ten =