You are currently viewing व्यसनमुक्तीसाठी बाप्पा समोर शपथविधी

व्यसनमुक्तीसाठी बाप्पा समोर शपथविधी

*व्यसनमुक्तीसाठी बाप्पा समोर शपथविधी*

नशाबंदी मंडळाचा अनोखा उपक्रम.

देवगड

नशाबंदी मंडळ महाराष्ट्र राज्य मुंबई शाखा सिंधुदुर्ग जिल्हा समिती च्या वतीने *उत्सव वाचवा व्यसन घालवा* या मोहिमेअंतर्गत देवगड पोलिस स्टेशनच्या गणपती बाप्पाच्या समोर आरतीच्या वेळी सर्वांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन बाप्पा कडे व्यसनमुक्त समाज निर्मितीचे साकडे घालण्यात आले. सर्वांनी एकजुटीने व्यसनांच्या विरोधात काम करुयात असे मत देवगड पोलिस स्टेशनचे निरिक्षक मा. निळकंठ बगळे यांनी व्यक्त केले. व्यसनमुक्ती प्रचार प्रसार प्रबोधन कार्याला सर्वांनी हातभार लावण्यासाठी पुढे यावे . आणि नशाबंदी मंडळाच्या वतीने सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाच्या निमित्ताने सपोर्टिव्ह , सहयोग हितचिंतक असा व्यसनमुक्ती बाबत विचार करणारा समाज निर्माण होईल यासाठी आपणं सभासद होण्यासाठी पुढे यावे असे आवाहन नशाबंदी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी देवगड पोलिस स्टेशनचे पोलीस बांधव उपस्थित होते.

देवगड पोलिस स्टेशनच्या गणपती बाप्पा समोर बाप्पाच्या आरती बरोबरच व्यसनमुक्तीची शपथही घेण्यात आली यावेळी देवगड पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री निळकंठ बगळे उपस्थित होते.नशाबंदी मंडळाच्या सिंधुदुर्ग जिल्हा संघटक अर्पिता मुंबरकर यांनी शपथ दिली

 

प्रतिक्रिया व्यक्त करा