You are currently viewing प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदूर्गतील ५ कैद्यांची सुटका…!

प्रजासत्ताक दिनानिमित्त सिंधुदूर्गतील ५ कैद्यांची सुटका…!

सिंधुदुर्गनगरी :

सिंधुदुर्गच्या तुरुंगामध्ये बंद असलेल्या काही श्रेणीतील कैद्यांना आजादी के अमृत महोत्सव अंतर्गत आज २६ जानेवारीला विशेष माफी दिली आहे. या निर्णयामुळे कारागृहातील कैद्यांना काही क्षणासाठी आशेचा किरण दिसला आहे.

आज २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त तुरुंगातील वैभव पोपट डावरे ,शाहूद्दीन तजमोहद शेख, विनायक अशोक मयेकर ,अकबर शहजाद खान ,उमेश संजय भोईर यांची सुटका करण्यात आली आहे.

आपल्या देशवासीयांना हे स्वातंत्र्य खूप संघर्षानंतर मिळाले आहे. सोन्याचा पक्षी म्हणून ओळखला जाणारा आपला देश स्वतंत्र झाला. यंदाचा प्रजासत्ताक दिन अधिक खास बनवण्यासाठी “मोदी सरकारच्या मास्टर प्लॅन” नुसार सरकारने तुरुंगातील कैद्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या प्लॅननुसार काही कैद्यांना स्वयंरोजगाराची सर्व प्रशिक्षणे देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व समाजात चांगले स्थान निर्माण करता यावे यासाठी सोडण्यात आले आहे. अधिक धोकादायक कायद्यांना आजादी की अमृत महोत्सवात कधीही माफी दिली जाणार नाही. अशी माहिती कारागृहचे पोलिस अधीक्षक हरिशचंद्र जाधव यांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =