You are currently viewing व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके घेऊन जावीत

व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके घेऊन जावीत

व्यवसाय अभ्यासक्रम उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके घेऊन जावीत

सिंधुदुर्गनगरी

 शैक्षणिक सत्र 2022 पर्यंतचे उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम, गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड फॅशन डिसायनिंग, शिवण व कर्तन या प्रमाणपत्र अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी त्यांचे उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रके अद्याप संस्थेतून घेऊन गेलेले नाहीत. अशा विद्यार्थ्यांनी स्वत:चे ओळखपत्र व पासपोर्ट फोटो सोबत आणून आपले उत्तीर्ण प्रमाणपत्र व गुणपत्रिका  कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस व सार्वजनिक सुट्टीची दिवस वगळून घेऊन जावे. असे आवाहन टोपीवाला स्मारक तंत्रशाळा तंत्राशाळा तंत्र माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक यांनी दिली आहे.

             शैक्षणिक सत्र वर्ष 1995 पासून ते शैक्षणिक सत्र वर्ष 2021 पर्यंतचे वर नमूद केलेल्या अभ्यासक्रमातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनी आपले गुणपत्रक व प्रमाणपत्र घेऊन जाण्यासाठी सोबत आपले ओळखपत्र (आधारकार्ड) व पासपोर्ट साईज फोटो-2 आणून कार्यालयीन वेळेत सुट्टीचे दिवस व सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून स्वत: घेऊन जावे. टोपीवाला स्मारक तंत्रशाळा तंत्र माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी येथील उच्च माध्यमिक व्यवसाय अभ्यासक्रम व प्रमाणपत्र अभ्यासक्रमची नाव पुढीलप्रमाणे आहेत. ऑटोमोबाईल टेक्नॉलॉजी (ऑटो इंजिनअरींग टेक्निशयन), इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी (घरगुती विद्युत उपकरणांची निगा व दुरुस्ती) . कॉम्प्युटर टेक्नॉलॉजी(कॉम्प्युटर टेक्निक). शिवण व कर्तन (1 वर्ष कालावधी अभ्यासक्रम) , गारमेंट मॅन्युफॅक्चरिंग ॲन्ड फॅशन डिझायनिंग (1 वर्ष कालावधी अभ्यासक्रम). कार्यालयीन वेळ सकाळी 10 ते संध्या.5.45 वाजपर्यंत (सोमवर ते शुक्रवार) सकाळी 10 ते संध्या. 2 वाजेपर्यंत (शनिवार) कार्यालयीन साप्ताहिक सुट्टी रविवार रोजी.अधिक माहितीसाठी कार्यालयीन दूरध्वनी  संपर्क 02363-272073, प्रशिक्षण विभाग मो. नं.7798576769 या  नंबर संपर्क करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

thirteen + 13 =