You are currently viewing मी पोस्ट कार्ड बोलतोय

मी पोस्ट कार्ड बोलतोय

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचाच्या सन्माननीय सदस्य वंदना पाटकरी लिखित “जागतिक टपाल दिन” निमित्त अप्रतिम लेख*

 

*मी पोस्ट कार्ड बोलतोय*

 

*सुट्टी म्हणजे*
*कामाचा वार*
*घरी सफाई*
*करते फार*

सुट्टीच्या दिवशी आठवड्या भराची काम करावी लागतात . माळ्यावरती खूप जुनी पुस्तके होती. मी रद्दी खूप झाली म्हणून काढण्यास गेले.पुस्तके निवडू लागले.जी कामाची ती बाजूला नको असलेली बाजूला! एक पुस्तक चाळतांना जुने पोस्ट कार्ड खाली पडले ? ते माझ्याकडे पाहून रडू लागले . मी पाहतच राहिले आणि *पोस्ट कार्ड बोलू लागले*…..

*धूळ खात पडलोय आज*
*किती तरी दिवसांनी*
*माझी काढत् नाही तुम्ही*
*मन दाटते आठवणींनी*
बघा!! माझी अवस्था आता कशी झाली आहे? मला आठवते माझा जन्म ऑस्ट्रेलियात झाला होता. त्या काळात मला खूप प्रसिद्धी मिळाली होती. संदेश एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहोच्यासाठी माझा खूप वापर होऊ लागला. हळूहळू सर्व देशांनी माझा स्विकार केला?

आपल्या भारतात मी पहिल्यांदा १८७९ साली प्रवेश केला.तेव्हा माझी किंमत फक्त तीन पैसे होती.सूचना, संदेश भारतात कुठेही पोचविणे शक्य झाले. भारताच्या भूमीवर कन्याकोपऱ्यातमी आनंदाने पोहोचू लागलो. पहिल्या चार महिन्यात माझी किंमत कमी असूनही, साडे सात लाख इतकी झाली विक्री झाली. माझा संदेश देवाणघेवाणीच्या कामात सर्रास वापर होऊ लागला. मला खूप प्रसिद्धी मिळू लागली….

लहापासून ते थोरांपर्यंत सारेच माझा वापर करू लागले.. स्वातंत्र्यासाठी संदेश पोहोचविण्यासाठी माझा खूप वापर होऊ लागला. क्रांतीविरांच्या हाती जेव्हा मी पडत असे तेव्हा मला जीवन सार्थकी लागल्याचा आनंद मिळत असे. मातृभूमीच्या स्वातंत्र्यासाठी मी कामी येऊ लागलो. तुम्ही आज जर देश भक्तांच्या घरी शोध घेतला तर त्याच्या घरी अजूनही माझ्या अस्तिवाच्या खुणा आढळतील. मी जेव्हा देशाच्या सैनिकांचा संदेश त्यांच्या कुटुंबात पोहोचवीत असे. तेव्हा मला खूप धन्य वाटे! त्यांची देशभक्ती पाहून अभिमान वाटत होता !

*स्वातंत्र्यासाठी लढणारे*
*देशभक्तांची भक्ती*
*संदेश मायदेशी देतेसे*
*एकवटे अंतरीच शक्ति*

पण आता मात्र मी नामशेष होत चाललो आहे. माझी जागा मोबाईल ने घेतली आहे. मी फक्त घूळ खात पडलेला असतो.माझ्याकडे कुणीही पाहत नाही. आत्ताच्या मुलांना तर माझी ओळख सुद्धा नाही. ते मला ओळखत सुद्धा नाही. यापेक्षा माझे दुर्दैव दुसरे ते काय ? मी आता इतिहास जमा झालो आहे. मला असे वाटते की बदलत्या काळात मानवाने माझा ही उपयोग करावा. लिहिण्याची माझी पद्धत फक्त शाळा कॉलेज यांत शिकविली जाते. पण माझा वापर केला जाता नाही.माझे एकच सांगणे आहे. माझा वापर व्हावा.

*विसरू नको मानवा*
*तु ऋण माझ्या कामाचे*
*कर आज माझाही वापर*
*नित्य वहन करी संदेशाचे*

हे बोलतांना पोस्ट कार्ड रडू लागले. मी फक्त ऐकतच राहिले. आणि खरंच आहे ते! पोस्ट कार्ड लिहिण्यात जी गंमत आहे ती टाइपिंग करण्यात नाही? लिखाणाची कला हळूहळू संपत चालली आहे. म्हणून लेखक म्हणतात लिहिते व्हा…..

✍️✍️✍️✍️✍️✍️
*लेखांकन ……*
*श्रीमती वंदना पाटकरी*
*शिक्षिका*
*डॉ. विजयराव व्ही रंधे इंग्लिश मेडीयम स्कूल शिरपूर*
*शिरपूर जि धुळे*

प्रतिक्रिया व्यक्त करा