You are currently viewing कणकवलीत 14 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार शिबीराचे आयोजन..

कणकवलीत 14 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार शिबीराचे आयोजन..

कणकवली :

कणकवलीतील आयडीयल नर्सिंग स्कूल व सिंधुगर्जना ढोलताशा पथकच्या वतीने 14 फेब्रुवारी रोजी मोफत आरोग्य शिबीर व विनामूल्य औषधोपचार शिबिर आयोजित करण्यात आले आहे. डॉ. अनिल ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. सायंकाळी ठीक 3 ते 7 या वेळेत श्री स्वयंभू विद्यामंदिर शाळा क्र. 2 बांधकरवाडी कणकवली येथे हे शिबीराचे आयोजन केले आहे. तरी रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये अनुभवी डॉक्टरांचा सल्ला व मार्गदर्शन तसेच निदान झालेल्या आजारांवर मोफत औषधोपचार करण्यात येतील. अधिक माहितीसाठी संपर्क या नंबर वर 7350847345 / 9422381995 साधावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × four =