बॅ. खर्डेकरच्या १९९४-९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून इमारत बांधकामासाठी आर्थिक मदत…!

बॅ. खर्डेकरच्या १९९४-९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांकडून इमारत बांधकामासाठी आर्थिक मदत…!

वेंगुर्ला

बॅ.खर्डेकर महाविद्यालयाच्या १२ वी सायन्स १९९४-९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांनी याच महाविद्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या प्रिन्सिपल एम. आर. देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. बॅ. खर्डेकर महाविद्यालयाच्या १२ वी सायन्स १९९४-९५ बॅचच्या माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन सन २०२०च्या मे महिन्यात घेण्यात येणार होते. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला. दरम्यान, याच बॅचच्या व्हॉटसॲप ग्रुपचे ॲडमिन अजित साटलेकर यांच्यासह एकेश्वर नाईक, चेतन अंधारी, सखाराम पडवळ, तुळशीदास ठाकूर, आशुतोष ठाकूर, अमोल तेरेखोलकर, गंगाराम उर्फ बाळू परब, डॉ. मुक्तानंद गवंडळकर व दर्शन सावंत यांनी उत्स्फूर्तपणे पुढाकार घेत देसाई इंग्लिश मिडियम स्कूलच्या नविन इमारतीच्या बांधकामासाठी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत केली. सदरची रक्कम महाविद्यालयाचे प्रा.डॉ.आनंद बांदेकर, सुरेंद्र चव्हाण व विधाता सावंत यांच्याकडे सुपूर्द केली. बॅचच्या या सहकार्याबद्दल महाविद्यालयातर्फे त्यांचे आभार मानण्यात आले. तसेच या ग्रुपने हॉस्पीटलनाका येथील एका गरीब कुटुंबाला धान्य व रोख रक्कमेची मदतही केली.

प्रतिक्रिया व्यक्त करा