You are currently viewing प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते

प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते

प्रजासत्ताक दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते

सिंधुदुर्गनगरी

प्रजासत्ताक दिनांच्या 73 व्या वर्धापन दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ गुरुवार दि. 26 जानेवारी 2023 रोजी पोलीस परेड ग्राऊंड,  येथे सकाळी 9.15 वा. आयोजित करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा हा मुख्य समारंभ संपन्न होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी दिली.

          मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभासाठी येणाऱ्यांनी सकाळी 8.45 वाजेपर्यंत आपल्या जागेवर स्थानापन्न व्हावे. समारंभास राष्ट्रीय पोषाखात यावे. मास्क परिधान करणे व शासनाने दिलेल्या कोविड नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील.

          मुख्य शासकीय समारंभ सकाळी 9.15 असल्यामुळे  इतर कार्यालय अगर संस्था यांनी आपल्या कार्यालयात ध्वजवंदनाचा कार्यक्रम सकाळी 8.30 च्यापूर्वी किंवा सकाळी 10 च्या नंतर आयोजित करावा.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × three =