You are currently viewing शेर्ला निगुडे सोनुर्ली नीरवडे मंजूर रस्त्याचे काम लवकर सुरू करा

शेर्ला निगुडे सोनुर्ली नीरवडे मंजूर रस्त्याचे काम लवकर सुरू करा

मनसे माजी तालुकाध्यक्ष गुरूदास गवंडे याची सार्वजनिक बांधकामकडे मागणी

सावंतवाडी

शेर्ला- निगुडे- सोनुर्ली- निरवडे या रस्त्याचं काम मंजूर असून ते लवकरात लवकर पूर्ण करावे आशी मागणी मनसेचे माजी तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सौ.अनामिका चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात असे नमूद केले की शेर्ला- निगुडे- सोनुर्ली- निरवडे रस्ता प्र.जि.मा.७१ की. मी. ५/५०० ते ७/५०० मध्ये डांबरीकरण करणे काम प्रगतीत असून सदर रस्त्यावरून वाहन चालवणे कठीण झाले आहे. या रस्त्यावरून सतत ओव्हरलोड खनिज वाहतूक होत असल्यामुळे रस्ता संपूर्णपणे खचला असून अनेक मोऱ्या ढासाळलेल्या आहेत. या संदर्भात तत्कालीन उपविभागीय अभियंता श्री. अनिल आवटी यांनी सदर रस्त्याची पाहणी केली होती. व मोऱ्या व संरक्षक भिंतीसाठी प्रस्ताव पाठवला होता तो मंजूर असून पावसाळ्यापूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करणे आवश्यक आहे.

अनेक वेळा या रस्त्यासाठी आम्ही आंदोलने उपोषणे केली असून सद्यस्थितीत फक्त जेसीबीच्या साह्याने ठेकेदाराने १ किलोमीटर पर्यंत गटार खोदकाम केले आहे .उर्वरित काम येत्या आठ दिवसात सुरू करा असा इशारा त्यांनी दिलेला आहे तसेच सावंतवाडी इन्सुली बांदा आपल्या सार्वजनिक बांधकाम चा रस्ता इन्सुली चर्च या ठिकाणी त्याच्या साईडला दोन्ही बाजूला गटार मारून पाण्याचे योग्य ते नियोजन करावे व अर्धवट राहिलेले डांबरीकरण त्वरित पूर्ण करावी असे त्यांनी आपल्या निवेदात नमूद केले आहे.

सदर रस्त्याबाबत दोन दिवसात कार्यवाही करू असे आश्वासन यावेळी कार्यकारी अभियंता अनामिका जाधव यांनी दिले तसेच उप अभियंता श्री. सरगे, शाखा अभियंता श्री रणशूर हेही उपस्थित होते या रस्त्या संदर्भात योग्य ते नियोजन करून रस्ता लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आदेश कार्यकारी अभियंता यांनी दिले आहेत आपल्या निवेदनाची एक प्रत सदर ठेकेदाराला देऊन लवकरात लवकर कार्यवाही करू असे आश्वासन त्यांनी श्री गवंडे यांना दिले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four + eleven =