You are currently viewing कन्या महाविद्यालयात पंचप्रण शपथ कार्यक्रम उत्साहात

कन्या महाविद्यालयात पंचप्रण शपथ कार्यक्रम उत्साहात

इचलकरंजी / प्रतिनिधी :

 

इचलकरंजी येथील श्रीमती अक्काताई रामगोंडा पाटील कन्या महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारताच्या अमृत महोत्सव वर्ष सांगता समारंभ निमित्त मेरी मिट्टी मेरा देश या अभियाना अंतर्गत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थीनींना सामूहिक पंचप्रण शपथ देण्यात आली. यामध्ये नऊ ऑगस्ट क्रांती दिन डोळ्यासमोर ठेवून शपथेचे वाचन करण्यात आले.

यावेळी भारताला 2047 पर्यंत आत्मनिर्भर आणि विकसित राष्ट्र बनवण्याचे स्वप्न साकार करु, गुलामगिरीची मानसिकता मुळापासून नष्ट करु, देशाच्या समृद्ध वारशाचा गौरव करु, भारताची एकात्मता बलशाही करु, देशाचे संरक्षण करणाऱ्या प्रति सन्मान बाळगू, देशाचे नागरिक म्हणून सर्व कर्तव्यांचे पालन करु अशी पंचप्रण शपथ महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते आणि विद्यार्थिनींनी घेतली. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. त्रिशला कदम यांनी ऑगस्ट क्रांती दिन आणि देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त घेतलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली.

देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या सर्वांना आदरांजली वाहिली. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. धीरज शिंदे, प्रा. संदीप पाटील, प्रा. वर्षा पोतदार, प्रा.अनिल कुंभार तसेच महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते, प्रशासकीय सेवक, शिक्षकेतर कर्मचारी, सीनिअर ज्युनिअर विभागातील सर्व विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा