हॉटेल पॉम्पस समोर उभा राहिलेला स्टॉल पी.डब्लू.डी. च्या जागेत….

हॉटेल पॉम्पस समोर उभा राहिलेला स्टॉल पी.डब्लू.डी. च्या जागेत….

मुख्याधिकारी यांची माहिती.

सावंतवाडीत हॉटेल पॉम्पस समोर मुख्य रस्त्याच्या कडेला अनधिकृतपणे उभा राहिलेला सावंतवाडी नगरपलिकेतील एका नगरसेविकेच्या मालकीचा असलेला हा स्टॉल नगरपालिकेच्या जागेत नसून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मालकीच्या जागेत असल्याचे सावंतवाडीचे मुख्याधिकारी संतोष जीरगे यांनी सांगितले.
संवाद मीडियाने मुख्याधिकाऱ्यांना संपर्क करून अनधिकृतपणे उभा राहिलेला स्टॉल हा नगरपालिकेच्या नगरसेविकेचा असल्याची व मुख्याधिकाऱ्यांची परवानगी घेऊन उभा केला आहे अशी माहिती सदर स्टॉल बाबत मिळाल्याने विचारणा केली होती. त्यावर खुलासा करताना मुख्याधिकाऱ्यांनी वरील माहिती दिली. त्यामुळे नगरपालिकेने आपल्या दिशेने आलेला चेंडू सार्वजनिक बांधकामच्या दिशेला फेकला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा