You are currently viewing महाविद्यालयातील विद्यार्थांना शासकीय रूग्णालयात सेवा देणे बंधनकारक करा – देव्या सुर्याजी

महाविद्यालयातील विद्यार्थांना शासकीय रूग्णालयात सेवा देणे बंधनकारक करा – देव्या सुर्याजी

महाविद्यालयातील विद्यार्थांना शासकीय रूग्णालयात सेवा देणे बंधनकारक करा – देव्या सुर्याजी

युवा रक्तदाता संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री आरोग्यमंत्र्यांकडे केली मागणी..

सावंतवाडी

आरोग्यदृष्ट्या सिंधुदुर्ग जिल्हा सक्षम होण्यासाठी गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात शासकीय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थांना डिग्री प्राप्त केल्यानंतर किमान एक वर्ष शासकीय रूग्णालयात सेवा देणे बंधनकारक करा, अशी युवा रक्तदाता संघटनेची मागणी असून याबाबत राज्याचे मुख्यमंत्री, सावंतवाडी सुपुत्र विधानसभा अध्यक्ष, आरोग्य मंत्री, तसेच स्थानिक आमदार त्यांचे लक्ष वेधणार असल्याची माहिती युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सुर्याजी यांनी दिली.

युवा रक्तदाता संघटना
सिंधुदुर्गच्या आरोग्य यंत्रणेच्या अभावाबाबत मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, स्थानिक आमदार यांच्याकडे अनेक वर्षे आवाज उठवत आहोत. तसेच लोकप्रतिनिधींकडेही पाठपुरावा करत आहोत. मात्र, आरोग्य यंत्रणा आजही व्हेंटिलेटरवर आहे. रिक्तपदांचा प्रश्न आजही कायम आहे. ही पद प्राधान्याने भरणं आवश्यक आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा रूग्णालयातील सर्व रिक्तपद तातडीनं भरली गेली पाहिजेत. यासाठी ज्यावेळी किमान ७५ टक्के पद भरली जातील. त्याचवेळी आरोग्याच्या प्रश्नाबाबत सिंधुदुर्गवासियांना दिलासा मिळू शकेल. यासाठी महाराष्ट्रातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व खासगी वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणाची डिग्री घेणारे जे विद्यार्थी आहेत. त्यांना गोवा राज्याप्रमाणे किमान एक वर्ष शासकीय रूग्णालयात सेवा देण बंधनकारक करणे आवश्यक आहे.
गोवा मेडिकल कॉलेजमध्ये एक वर्ष शासकीय रुग्णालयात सेवा देण्यासाठीचा करार केला जातो. तसाच निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेणं आवश्यक आहे. त्यामुळे आपोआप रिक्तपदांचा प्रश्न निकाली लागेल. त्यानंतर यातील काही डॉक्टर हे कायमस्वरूपी शासकीय सेवेत देखील रूजू होतील आणि रिक्तपदांचा गंभीर प्रश्न सुटेल. त्यामुळे गोवा राज्याप्रमाणे महाराष्ट्र राज्यात देखील हा निर्णय घ्यावा यासाठी आरोग्याच्याबाबतीत संवेदनशील असणाऱ्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत, स्थानिक आमदार शिक्षणमंत्री दीपक केसरकर, विधानसभा अध्यक्ष अँड. राहुल नार्वेकर यांचे युवा रक्तदाता संघटनेच्या माध्यमातून लक्ष वेधणार असल्याचे देव्या सुर्याजी यांनी सांगितले.
दरम्यान सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय सावंतवाडीत कायमस्वरूपी फिजीशीयनची नियुक्ती करण्यात यावी. डॉ. अभिजित चितारी यांनी राजीनामा दिल्यानंतर पुर्ण वेळ फिजीशीयन या उपजिल्हा रुग्णालयात उपलब्ध नाही. डॉ. अंबापुरकर, डॉ. निर्मला सावंत हे ऑन कॉल येत आहेत. ते देखील चांगली सेवा देखील देत आहेत. परंतु, त्याचबरोबर कायमस्वरूपी फिजीशीयन रूग्णालयात असणे आवश्यक आहे. फिजीशीयन हा रूग्णालयाचे ‘हृदय’ आहे‌. त्यामुळे कायमस्वरूपी फिजीशीयन रूग्णालयाला द्यावा अशी मागणी देव्या सुर्याजी यांनी केली आहे.

*संवाद मीडिया*

*आता कोल्हापूर बेळगावला जायची गरज नाही, 👉 सर्व काही मिळेल एकाच छताखाली…*🏃‍♀️🏃‍♂️

*🌈 ज्योती एंटरप्रायझेस 🌈*

*🏬होलसेलमध्ये बिल्डिंग मटेरियल उपलब्ध*

*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*👉घेवून आले आहेत आता बांदा येथे ही सेवा*

*🏬बिल्डिंग मटेरियल, टाईल्स ग्रॅनाईट, कोटा मार्बल आणि कडप्पा सर्व काही एकाच ठिकाणी वेगवेगळ्या व्हरायटी मध्ये उपलब्ध…!*

*👉विशेष म्हणजे तोच दर्जा आणि चांगली सेवा अगदी घरपोच (Paid Service) …!!*

*आमचा पत्ता*👇
*♻️ज्योती एंटरप्रायझेस♻️*

*नियोजित तपासणी नाक्याच्या बाजूला, मुंबई-गोवा हायवे बांदा, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग.*

*☎️संपर्क:-*👇
*_सुलतानसिंग चौधरी_*

*📲9422767484 / 8317256802*

*जाहिरात लिंक*👇
https://sanwadmedia.com/111496/
———————————————-
*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + 3 =