You are currently viewing बा विठ्ठला

बा विठ्ठला

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री शीला पाटील लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

*बा विठ्ठला* 🌹

 

माझ्या सावळ्या विठ्ठला

तुझ्या भक्तीत रंगले

टाळ मृदूंग चिपळ्या

वाजवीत मी दंगले

 

उभा वीटेवरी बा तु

युगे झाली अठ्ठावीस

आता तरी खाली बैस

जीव होई कासावीस

 

चंद्रभागा नि भिमाई

दोघी वळसा घालुन

भक्त येति दर्शनासीj

स्नान संध्या उरकुन

 

आषाढी नि कार्तिकीला

येतो वारकरी मेळा

संगे घेवुन पताका

होतो कौतुक सोहळा

 

पंढरीच्या पांडुरंगा

तुझ्या कीर्तनात दंग

रुप सावळे सुंदर

गाईन तुझे अभंग

 

तुझ्या दर्शनाने देवा

फिटे पारणे डोळ्याचे

नित्य सेवा तुझी घडू दे

हेचि मागणे आमचे

 

*शीला पाटील. चांदवड.*

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen − 15 =