You are currently viewing मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आंगणेवाडी जत्रेला उपस्थिती

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आंगणेवाडी जत्रेला उपस्थिती

जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांचे आंगणेवाडी सह जिल्ह्यात जंगी स्वागताची तयारी – बबन शिंदे

मालवण / मसुरे :

 

नवसाला पावणारी आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीची वार्षिक यात्रा ४ फेब्रुवारीला होत आहे. श्री भराडी देवीच्या कृपाशीर्वादाने एकनाथ शिंदे हे आज महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. त्यांची आई भराडी देवीवर अपार श्रद्धा असून यंदाच्या आंगणेवाडी जत्रेला स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. उद्योगमंत्री उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांची त्यांच्याशी चर्चा झाली आहे, अशी माहिती बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे कुडाळ मालवण क्षेत्रप्रमुख बबन शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली. जिल्हाप्रमुख संजय आग्रे, महिला जिल्हाप्रमुख वर्षा कुडाळकर यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्र्यांचे आंगणेवाडी सह जिल्ह्यात जंगी स्वागत केले जाणार असल्याचे ते म्हणाले.

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी किसन मांजरेकर, बाळू नाटेकर, पराग खोत, ऋत्विक सामंत, नीलम शिंदे, भारती तोडणकर, आदी उपस्थित होते. ना. उदय सामंत, ना. दीपक केसरकर यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांशी चर्चा झाली आहे. लवकरच मालवण तालुक्याच्या वतीने मुख्यमंत्र्यांना भेटून आंगणेवाडी भेटीचे रीतसर निमंत्रण दिले जाणार आहे, असे बबन शिंदे म्हणाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 − six =