You are currently viewing रोटरी क्लबतर्फे कर्णबधीर व्यक्तींसाठी श्रवणयंत्रे माफक किमतीत देणार

रोटरी क्लबतर्फे कर्णबधीर व्यक्तींसाठी श्रवणयंत्रे माफक किमतीत देणार

कणकवली

रोटरी क्लब सिंधुदुर्ग यांच्यावतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील कर्णबधीर व्यक्तींसाठी श्रवणयंत्रे माफक किमतीत देण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. यात ज्येष्ठ नागरिक, दारिद्र्य रेषेखालील लोक, दिव्यांग, अपंगांना प्राधान्य देण्यात येणार आहे.

श्रवणयंत्रे वाटपाचा सावंतवाडीतील कार्यक्रम गुरुवार २६ जानेवारीला १० ते १२.३० या वेळेत सालईवाडा येथील रोटरी क्लब हाऊस येथे होईल. दुपारी २.३० ते ४.३० या वेळेत कणकवली येथील डॉ. विद्याधर तायशेटे यांच्या हॉस्पिटलमध्ये होईल. श्रवणयंत्रे मिळण्यासाठी नावनोंदणी करणे गरजेचे असून सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले, दोडामार्ग तालुक्यातील व्यक्तींनी ( ९४२१२२२९९९) तर कणकवली, मालवण, वैभववाडी, देवगड तालुक्यातील व्यक्तींनी ( ९४०४१२०८०६ ) या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन रोटरी क्लबतर्फे करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 11 =