You are currently viewing फोंडाघाट मध्ये आज रंगणार अमित कदम यांच्या फ्युचर फिटचा थरार

फोंडाघाट मध्ये आज रंगणार अमित कदम यांच्या फ्युचर फिटचा थरार

फोंडाघाट

महाराष्ट्र बॉडीबिल्डर असोसिएशन यांच्या मान्यतेने फ्युचर फिट जिम आयोजित जिल्हास्तरीय “सिंधुदुर्ग श्री 2023” ही शरीरसौष्टव व मेन फिजिक्स स्पर्धा आज राधाकृष्ण मंगल कार्यालय, एस. टी स्टँड फोंडाघाट या ठिकाणी होणार आहे.

या इव्हेंटचे लाईव्ह प्रक्षेपण मोठ्या पडद्यावर होणार आहे. ईव्हेंट मधील प्रक्षीक्षक आणि त्यातील मास्टर हे विजेता घोषीत करतील. पहीले बक्षीस रु.१,४०,००० असणार आहे.

सिंधुदुर्ग जिल्यात प्रथमच फोंडाघाटला हा मान मिळाला आहे. विनामुल्य हाॅल दिल्याने अमित कदम यांचे कडुन श्री.भावेश कराळे यांचा सन्मान होणार आहे. राधाकृष्ण मंगल कार्यालय अश्या प्रकारच्या कार्यक्रमाला कायमच सपोर्ट करते. स्व.राधाकृष्ण ( बाबा नाडकर्णी ) यांची कार्यप्रणाली जोपासण्याचा प्रयत्न सामाजीक कार्यकर्त अजित नाडकर्णी हे करत असतात.

सर्वांनी उपस्थित राहुन बाॅडी बिल्डरना चिअर्स अप करावे असे आवाहन अमित कदम यांनी केले.या होतकरु मुलाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, पं समिती, जि.प. पदाधिकारी राहाणार उपस्थित रहाणार आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

four × 3 =