You are currently viewing डोंबिवलीला कोकणवासीय मित्र मंडळ स्नेहसंमेलन रविवारी!*

डोंबिवलीला कोकणवासीय मित्र मंडळ स्नेहसंमेलन रविवारी!*

मुंबई :

परस्परांच्या ओळखीतून स्नेहभाव वृद्धिंगत व्हावा आणि कौटुंबिक जिव्हाळा आपलुकी निर्माण व्हावी या उद्देशाने प्रतिवर्षी प्रमाणे कोकणवासीय मित्र मंडळ डोंबिवली यांचे ३५वे वार्षिक स्नेहसंमेलन रविवारी दि. २२ जानेवारी २०२३ रोजी संध्याकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत सर्वेश सभागृह डोंबिवली (पूर्व) येथे संपन्न होणार आहे. नेहमी मुलांच्या कलागुणांना वाव मिळावा यासाठी वेशभूषा स्पर्धा, रंगारंग स्पर्धा व वार्षिक पारितोषिकासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या स्नेहसंमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहून मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी यावे असे मंडळाचे अध्यक्ष अशोक चोपडेकर, सचिव रत्नाकर सारंग, खजिनदार बापू कुबल यांनी संयुक्तरीत्या आवाहन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

18 − 10 =