You are currently viewing किती वर्णू मी गोडवा!

किती वर्णू मी गोडवा!

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सायली कुलकर्णी यांची काव्यरचना*

 

*किती वर्णू मी गोडवा!*

 

जेथे नांदतात धर्म

सारे गुण्यागोविंदाने

जरी भाषा जाती भिन्न

तरी जोडलेली मने

योग, शास्त्र नि वेदांची

जेथे अमुल्य संपदा

अशा भारतमातेचा

किती वर्णू मी गोडवा!

 

जेथे रामन, कलाम

असे शास्त्रज्ञ जन्मले

लता, सचिन, कल्पना

यांनी नाव उंचावले

जेथे जन्मली अहिल्या

लक्ष्मीबाई नि शिवबा

अशा भारतमातेचा

किती वर्णू मी गोडवा!

 

गिरीराज हिमालय

ज्याचा मुकुट साजिरा

तीन बाजूंस लाभला

ज्याला अथांग किनारा

जेथे वाहते हो कृष्णा

गंगा, गोदा नि नर्मदा

अशा भारतमातेचा

किती वर्णू मी गोडवा!

 

©सायली कुलकर्णी

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen + 17 =