You are currently viewing एमआयटी एडीटी’चा काफिला एडव्हेंचर्स सोबत सामंजस्य करार

एमआयटी एडीटी’चा काफिला एडव्हेंचर्स सोबत सामंजस्य करार

*’एमआयटी एडीटी’चा काफिला एडव्हेंचर्स सोबत सामंजस्य करार*

*पर्वतारोहण, ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, पॅराग्लायडिंग उपक्रमांसाठी मिळणार सहकार्य*

पुणेः

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास (होलिस्टिक डेव्हलपमेंट) आणि समाजिक संलग्नता या दिशेने एक महत्त्वाची वाटचाल करताना, काफिला एडव्हेंचर्स आणि एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नॉलॉजी विद्यापीठाने एका दूरदर्शी सामंजस्य करारावर अधिकृतपणे शिक्कामोर्तब केले.
विद्यार्थ्यांसाठी साहसी उपक्रमांद्वारे प्रायोगिक शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी करण्यात आलेल्या या महत्त्वाकांक्षी भागीदारीचे उद्घाटन एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष आणि कुलगुरू प्रा. डॉ. मंगेश कराड यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. यावेळी काफिला एडव्हेंचर्स तर्फे श्रुती देशमुख, अभिषेक निला, आदर्श देशमुख, तुषार कुमार, वैभव कळसकर आणि एमआयटी एडीटी एडव्हेंचर क्लबचे प्रा.आनंदराव जाधव व प्रा. निशिगंधा पटेल आदी उपस्थित होते.
काफिला ऍडव्हेंचर्स ही साहसी क्रीडाप्रकारांत मार्गदर्शन करणारी एक प्रतिष्ठित संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून गड-किल्ले मोहिमा, जंगल सफारी, ट्रेक, बॅकपॅकिंग टूर आणि तरुणाईमध्ये निसर्गाबद्दल प्रेम निर्माण करण्यासाठी रॉक कल्याम्बिंग, रिव्हर राफ्टिंग इ. सारख्या साहसी उपक्रमांचे आयोजन करत असते.या करारावर स्वाक्षरी करताना प्रा. डॉ.कराड यांनी काफिला एडव्हेंचर्स सोबतच्या धोरणात्मक भागिदारीबद्दल आनंद व्यक्त केला. तसेच यावेळ त्यांनी, सर्वसमावेशक विकासासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक प्रवास समृद्ध करण्यासाठी हा करार अत्यंत उपयोगी ठरणार असल्याचे मत मांडले. हा करार विद्यार्थ्यांना पारंपारिक शिक्षणाबरोबरच शारीरिक तंदुरुस्ती, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता इत्यादी गुण वाढविण्यासाठी मदत करेल, असेही ते यावेळी म्हणाले.विद्यार्थी कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक प्रा.डॉ. सुराज भोयर यांनी या सामंजस्य कराराच्या उद्दिष्टांची माहिती दिली. साहसी-आधारित शिक्षणाला शैक्षणिक चौकटीत समाकलित करणे, विद्यार्थ्यांना ट्रेकिंग, रॉक क्लाइंबिंग, सर्वायवल टेक्निक आणि पर्यावरणीय शिक्षण यासारख्या क्रियाकलापांमध्ये सहभागी होण्यास सक्षम करणे हे युतीचे उद्दिष्ट आहे. हे प्रयत्न विद्यार्थ्यांमध्ये सांघिक कार्य, अनुशासन, सांस्कृतिक संवेदनशीलता आणि पर्यावरणविषयक चेतना यासारखी अमूल्य कौशल्ये विकसित करण्यासाठी नक्कीच मोलाचा वाटा उचलतील अशी आशाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

*संवाद मिडिया*

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————

*वेबसाईट*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*चॅनेल*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा

ten + 5 =