You are currently viewing शिवसेनेच्या वतीने कुडाळ लक्ष्मीवाडी व श्रीरामवाडी येथे जेष्ठांचा सन्मान

शिवसेनेच्या वतीने कुडाळ लक्ष्मीवाडी व श्रीरामवाडी येथे जेष्ठांचा सन्मान

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य

*आमदार वैभव नाईक यांची उपस्थिती*

शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेनेचे माजी नगरसेवक श्री सचिन काळप यांच्या वतीने आज कुडाळ शहरातील लक्ष्मीवाडी व श्रीरामवाडी येथील १५० जेष्ठ नागरिकांना आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्री वाटप करून त्यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी आमदार वैभव नाईक म्हणाले,मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमांनी जिल्ह्यात साजरा करण्यात येत आहे.यानिमित्त सचिन काळप यांनी जेष्ठ नागरिकांसाठी घेतलेला उपक्रम स्तुत्य आहे. जेष्ठ नागरिकांच्या ज्या काही अडचणी असतील त्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी आहोत. यापुढच्या काळातही जेष्ठ नागरिकांसाठी असे अनेक उपक्रम घेण्यात येणार असल्याचे आ. वैभव नाईक यांनी सांगितले.

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, अतुल बंगे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, तालुका प्रमुख राजन नाईक, उपसभापती जयभारत पालव, तालुका संघटक बबन बोभाटे, सचिन काळप, संदीप म्हाडेश्वर, राजू गवंडे, सिद्धेश काळप, शहरप्रमुख संतोष शिरसाट, संतोष अडुलकर, सत्यवान कांबळी, संजय भोगटे, बाळा वेंगुर्लेकर, यश राणे, अमित राणे, पप्पू धुरी, राजन काळप, महेश राऊळ, शेखर बाईत, प्रदीप घाडी, जगदीश राऊळ, गणेश राऊळ, हर्षद काळप, विजय घोगळे, गोट्या धुरी, शैलेश काळप आदी शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen − three =