You are currently viewing मसुरे डांगमोडे येथे कार्यकर्त्यांसह माजी उपसभापती छोटू ठाकूर यांचा भाजप मध्ये प्रवेश

मसुरे डांगमोडे येथे कार्यकर्त्यांसह माजी उपसभापती छोटू ठाकूर यांचा भाजप मध्ये प्रवेश

मालवण:

 

मालवण पंचायत समिती माजी उपसभापती छोटू ठाकूर यांनी उबाठा शिवसेना पक्षातून आपल्या शेकडो कार्यकर्त्यां सह भाजपा नेते निलेश राणे व दत्ता सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजप मध्ये प्रवेश केला.

विरोधक राणे साहेबांवर टीका करतात पण टीका करताना त्यांच्या विकासात्मक कामांची सुद्धा स्पर्धा करा. जिल्ह्यात आरोग्य, शैक्षणिक, पर्यटन औधोगिक आदी विविध बाबींमध्ये नारायण राणे यांचे मोठे योगदान आहे. अनेक अधिकारी पहिल्यांदा सिंधुदुर्गला निधी द्यायचे कारण त्यांना राणे साहेबांची भीती होती. परंतु मागील नऊ वर्षात जिल्हा विकासाचा निधी कमी झाला. गेली सत्तावीस वर्ष नारायण राणे साहेबांच्या विचारांची सत्ता जिल्हा परिषद मध्ये आहे. ज्या माणसामुळे माझ्या राणे साहेबांचा पराभव झाला त्याला पाडण्यासाठी ती पराभवाची लाल रेघ मला माझ्या आयुष्यातून पुसायची आहे. येथील आमदारांच्या भूल थापाना जनता कंटाळली आहे. त्यामुळे आगामी काळात तुमच्या आशीर्वादाच्या जोरावर येथील विकासाचा बॅकलॉग भरून काढला जाईल असे प्रतिपादन माजी खासदार डॉ निलेश राणे यांनी मसुरे डांगमोडे येथे केले.

यावेळी ठाकूर यांच्या सोबत माजी प. स. सदस्या सौ गायत्री ठाकूर, नवतरुण मंडळ अध्यक्ष पांडुरंग ठाकूर, मर्डे ग्रा सदस्य सचिन पाटकर, सौ गार्गी चव्हाण, जगगु चव्हाण, सौ पूजा ठाकूर, राजू सावंत, आंगणेवाडी शाखा प्रमुख संजय आंगणे, सचिन आंगणे, शशांक परब यांनी सुद्धा प्रवेश केला. यावेळी बोलताना माजी खास. निलेश राणे म्हणाले, आमच्या कुटुंबातील जुना सदस्य छोटू ठाकूर पुन्हा भाजप परिवारात आला आहे. आमचाही डोळा छोटू ठाकूर यांच्यावर होता.काम करणारा माणूस म्हणून छोटू ठाकूर यांची ओळख आहे. तुम्ही जे विकास काम बोलाल ते पूर्ण होणार. सत्ता आपली आहे.मागच्या नऊ वर्षात झाली नाहीत ती सर्व कामे पूर्ण होतील.जनतेच्या प्रेमामुळे राणे साहेब मोठे झाले. दत्ता सामंत यांचे मन मोठे आहे की ज्यांनी पुढचा आमदार निलेश राणे असेल असे जाहीर केले आहे. निलेश राणेनी शब्द दिला की मग मागे नाही. नऊ वर्षात या जिल्ह्याला जे मिळाले नाही ते आम्ही देणार आहोत. डीपीडिसी मध्ये पहिल्यांदा जास्त निधी सत्ता बदल झाल्या नंतर मालवण तालुक्याला मिळाला आहे. यासाठी पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे सुद्धा आभार मानायलाच हवे. भाजप मध्ये मोठ्या प्रमाणात प्रवेश होत असल्याने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. येणाऱ्या काळात तुमचे आशीर्वाद आमच्या पाठीशी राहुध्या.देशात मोदी साहेबांच्या रुपात भक्कम नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे देशात पुन्हा एकदा भाजपचीच सत्ता येणार आहे. विकासात हा मतदारसंघ मागे गेला आहे तो बॅकलॉग आपल्याला भरून काढायचा आहे.विकास कामे न झाल्यास निलेश राणे तुमच्या समोर येणार नाही. जनतेचा आशीर्वाद ही राणेंची ओळख आहे. या मातीचे ऋण आमच्यावर आहेत. त्यासाठी यापुढेही काम करत राहणार आहे, असे ते म्हणाले.

यावेळी दत्ता सामंत यांनी येथील आमदारांवर हल्ला बोल करत आमदारांनी ठेकेदारी केल्याचे सांगितले. कोल्हापूर येथील ठेकेदारांच्या नावावर वैभव नाईक ठेके घेत आहेत. आम्ही माणुसकी जपणारी माणसे आहोत. सर्व कार्यकर्ते राणेसाहेब याना मानणारे आहोत. २०१४ नंतर मतदार संघात परिवर्तन झाले मागील दहा वर्षात हा भाग विकासापासून दूर राहिला. अफवा पसरवण्याचे काम समोरून झाले. खोट्या भूलथापांना बळी पडल्यामुळे येथील आमदाराचा फायदा झाला. दत्ता सामंत राणे साहेबांचा कार्यकर्ता आहे. सर्वांच्या भवितव्यासाठी निलेश राणे यांची या मतदार संघाला गरज आहे. विरोधी आमदारांनी दिलेली आश्वासने पाळली असती तर प्रवेश थांबवण्याची वेळ आज आली नसती. २०२४ मध्ये राज्यात सर्वाधिक मताधिक्य देऊन हा मतदार संघ मागे नेलेल्या आमदाराला धडा शिकवूया. उद्याचा आमदार निलेश राणे यांच्या रूपाने पाठवायचा आहे. राणे साहेबांच्या विचारातून घडलेले हे नेतृत्व आहे.पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि निलेश राणे यांच्या मार्गदर्शनातून वर्षभरात सर्व कामे पूर्ण होतील असे सामंत म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर भाजप तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, बिळवस सरपंच सौ मानसी पालव, वेरल सरपंच धनंजय परब, महान सरपंच अक्षय तावडे, मालोंड सरपंच सौ फणसेकर, वडाचापाट सरपंच सौ सोनिया दयानंद प्रभुदेसाई, कलमठ सरपंच संदीप मेस्त्री, भाजप भटके विमुक्त आघाडी उपाध्यक्ष बाळा गोसावी, नवलराज काळे, माजी जी प अध्यक्ष सरोज परब, माजी सरपंच लक्ष्मी पेडणेकर, सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मसुरे देवस्थान प्रमुख बाबुराव प्रभुगावकर, माजी सभापती राजेंद्र प्रभुदेसाई, बाळू कुबल, महेश बागवे, विजय केनवडेकर, अनिल निवेकर, संतोष पालव, संतोष साटविलकर, अनिल कांदळकर, भाई मांजरेकर, महेश मांजरेकर, सुनील घाडीगांवकर, पोईप सरपंच श्रीधर नाईक, सुधीर साळसकर, जितेंद्र परब आदी सह भाजप पदाधिकारी, सरपंच, सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम संपल्या नंतर विविध भागातुन आलेल्या भाजप पदाधिकाऱ्यांनी विकास कामांची निवेदने नीलेश राणे यांना दिली. सुत्रसंचलन राजा सामंत, विठ्ठल लाकम, प्रास्ताविक प्रकाश ठाकूर तर आभार अध्यक्ष धोंडी चिंदरकर यांनी मानले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा