You are currently viewing दिलीप भालेकर यांचा व्यापारी संघातर्फे सत्कार

दिलीप भालेकर यांचा व्यापारी संघातर्फे सत्कार

सावंतवाडी

सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघ व सावंतवाडी तालुका व्यापारी संघ यांच्या संयुक्त विद्यमाने परिट समाजाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालेकर यांना अखिल भारतीय धोबी (परिट) महासंघाच्या वतीने राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. हा सत्कार जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी जिल्हा व्यापारी संघाचे माजी अध्यक्ष द्वारकानाथ घुर्ये, निलेश धडाम, नंदन वेंगुर्लेकर, तालुका व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर, चित्तरंजन रेडकर, बाळासाहेब बोर्डेकर, किरण सिद्धे, आनंद नेवगी, पुंडलिक दळवी, ॲड. संजू शिरोडकर, हेमंत मुंज, वल्लभ नेवगी, आसिफ बिजली, संदेश परब, दत्ता सावंत आदी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यापारी संघाचे जिल्हाध्यक्ष प्रसाद पारकर व सावंतवाडी तालुका व्यापारी संघाचे तालुकाध्यक्ष जगदीश मांजरेकर व सर्व व्यापारी संघाचे पदाधिकारी यांनी दिलीप भालेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी दिलीप भालेकर म्हणाले की, हा माझा घरचा सत्कार आहे हा सत्कार मी कधीही विसरू शकणार नाही व सत्कार केल्याबद्दल व्यापारी संघांचे सर्व पदाधिकारी तसेच व्यापारी बांधवांचे आभार मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

2 + fifteen =