You are currently viewing कणकवली जवळ गडनदीपूल वागदे येथे बसचा अपघात; २ ठार, ३० जखमी

कणकवली जवळ गडनदीपूल वागदे येथे बसचा अपघात; २ ठार, ३० जखमी

कणकवली :

 

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली जवळ गडनदीपूल वागदे येथे खासगी आराम बसचा भीषण अपघात झाला. ही बस पुण्याहून गोव्याकडे जात होती. भीषण अपघातात दोन प्रवासी ठार तर 30 प्रवाशी जखमी झाले असून दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींवर कणकवली उपजिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीवरून, खासगी बसमध्ये एकूण 37 प्रवासी होते. पहाटे 5.30 वाजता हा अपघात झाला. चालकाचा ताबा सुटल्याने बस पलटी झाली. अपघातात शैलजा प्रेमानंद माजी (56,रा. दोडामार्ग) व अण्णा गोविंद नाले (52,रा. सातारा) यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक तसेच पोलिस कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना तातडीने उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपजिल्हा रुग्णालयात दाखल जखमी पैकी दहा जणांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. या महामार्गावर या ठिकाणी सतत अपघात होत असून त्यावर उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five + 19 =