*श्रीशब्द लालित्य साहित्य समूह तथा जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचच्या सन्मा सदस्या लेखिका कवयित्री सौ स्नेहा नारिंगणेकर लिखित अप्रतिम भावगीत*
तुला मागताना
हृदयी फुलावे स्वप्न हे प्रीतीचे
झळाळून यावे अंबर सुखाचे ||धृ||
तुला साद मी चांदण्यात घातली
सुखाची पहाट ही अशी दाटली
तुला मागताना शब्द प्रेमाचे
झळाळून यावे अंबर सुखाचे ||1||
लाटांच्या गाजेत प्रित मी आळतो
सागराच्या प्रीतीचा छंद मी पाळतो
तुला भेटताना क्षण आनंदाचे
झळाळून यावे अंबर सुखाचे ||2||
उंच डोंगरांच्या दरीतुनी वाहतो
वारा हा सुखाचा तुलाही स्पर्शतो
तुला शाहरताना कण अमृताचे
झळाळून यावे अंबर आनंदाचे ||3||
तुझ्या डोळ्यात जेव्हा मी पाहतो
एका वेगळ्या दुनियेत मी राहतो
मिळालो आम्ही व्हाया एकमेकाचे
झळाळून यावे अंबर आनंदाचे ||4||
हृदयी फुलावे स्वप्न हे प्रीतीचे
झळाळून यावे अंबर आनंदाचे ||धृ||
सौ.स्नेहा धोंडू नारिंगणेकर
शिरोडा सिंधुदुर्ग
7066998796
