सिंधुदुर्ग जिल्हा सु.बे.अभियंता संघटना स्थापन….

सिंधुदुर्ग जिल्हा सु.बे.अभियंता संघटना स्थापन….

सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग जिल्ह्याची सु.बे.अभियंता संघटना (सुशिक्षित बेकार) स्थापना करण्यात आली. यावेळी जिल्ह्यातील तालुकानिहाय पदाधिकारी व सु. बे. अभियंते उपस्थित होते. सु. बे. अभियंत्याना वेळोवेळी होत असलेल्या समस्या सोडविण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली.
जिल्हा कार्यकारणी निवड सर्वानुमते करण्यात आली. जिल्हाध्यक्ष : सागर भोगटे (कुडाळ), कार्याध्यक्ष- जिल्हा संघटक : उदय पाटील, उपाध्यक्ष : हर्षवर्धन कदम (देवगड), जिल्हा सचिव : संजय चोडणकर (सावंतवाडी), खजिनदार : निखिल नेमळेकर (मालवण), जिल्हा सदस्य : शुभम वैद्य (वेंगुर्ला), स्वप्निल देसाई (दोडामार्ग) व्यकटेश सावंत (कणकवली), रामचंद्र बावदाने (वैभववाडी) महिला प्रतिनिधी : प्राची नार्वेकर (सावंतवाडी) निकिता चोडणकर (सावंतवाडी) किरण परुळेकर (वेंगुर्ला). यावेळी जिल्ह्यातील सु. बे. अभियंता व तालुका प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा