You are currently viewing आंबोली घाटातील महिलेचा खून… अवैद्य दारू व्यवसायात मिळणाऱ्या पैशांची मस्ती….

आंबोली घाटातील महिलेचा खून… अवैद्य दारू व्यवसायात मिळणाऱ्या पैशांची मस्ती….

सावंतवाडी गार्डनचे पार्किंग तर त्यांचा गुन्हेगारीचा अड्डा..

आंबोली घाटात सडलेल्या अवस्थेत मिळालेला मृतदेह आणि त्याचा काहीच दिवसात केलेला तपास ही सावंतवाडी पोलिसांची कामगिरी नक्कीच कौतुकास्पद आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गोते आणि त्यांच्या संपूर्ण टीमने कोणताही पुरावा हाती नसताना अतिशय शिताफीने केलेला तपास, आणि काही कळायच्या आधी मोबाईल मधील कॉल रेकॉर्डिंग वरून संशयित आरोपीना केलेली अटक म्हणजे सुतावरून स्वर्ग गाठण्यासारखेच आहे. *परंतु पोलिसांची ही कामगिरी कौतुकास्पद असली तरी सावंतवाडीत नव्यानेच तयार झालेली तरुण मुलांची ही अवैद्य धंद्याशी निगडित गॅंग हे सुद्धा सावंतवाडी पोलिसांचे अपयश असल्याचे दिसून येते.*
सावंतवाडीत ही गुन्हेगारी प्रवृत्ती जन्म घ्यायला जेवढा अवैद्य दारू धंद्यातून मिळणारा पैसा कारणीभूत आहे. तेवढेच दारू धंदेवाल्यांना संरक्षण देणारे पोलिसही जबाबदार आहेत. दारूच्या अवैद्य व्यवसायात व्यावसायिक पैसे कमावतात, त्यांना संरक्षण देणारे पोलिसही हफ्ता घेऊन सहीसलामत राहतात, परंतु पैशांच्या हव्यासापोटी तारुण्यात गैर धंद्यात अडकणारे, बक्कळ पैसे आणि खायला प्यायला मिळणारी दारू यासाठी तरुण मात्र आयुष्यातून उठतात. गोवा बनावटीची दारू वाहतूक करून तरूनपणातच मिळणारा अमाप पैसा यामुळे अचानक मिळालेल्या पैशातून अशा तरुणांना वाईट व्यसनं लागतात आणि व्यसनाधीन झालेल्या तरुणांना फिरवायला दारू व्यावसायिकांच्या महागड्या गाड्या भेटतात.त्यामुळे नशेच्या जोरावर व्यसनांबरोबरच आपली कामेच्छा पूर्ण करण्यासाठी व्यावसायिक मुली, स्त्रिया शोधून गैर कृत्य करतात. असे गैर कृत्य लपून छपून करताना नशेच्या गर्तेत एखाद्याचा जीव जातो आहे याचेही भान त्यांना राहत नाही, आणि ते गैर कृत्य लपविण्यासाठी पुढे त्यांच्या हातून आणखी गुन्हे घडतात त्यातून ते आयुष्यभरातून बरबाद होतात.
सावंतवाडीतील दारूच्या अवैध्य व्यवसायात पूर्वीपासूनच कार्यरत असलेल्या एका धंदेवाल्याच्या मुलाने तर भोसले उद्यानाचे पार्किंग हाच अड्डा बनविला आहे. स्वतःसोबत शहरातील कितीतरी तरुण कोवळ्या मुलांना फिरवायला गाडी, दारू, मटणाच्या पार्ट्या देऊन अवैद्य धंद्यांमध्ये ओढतो आहे. गार्डनच्या पार्किंगमध्ये गाड्यांमध्ये बसून प्लॅनिंग करत तिथून दारूच्या व्यवसायात गुंतलेली ही तरुण मुले महागड्या गाड्यांमधून मुली, स्त्रिया यांना घेऊन जीवाची मजा करण्यासाठी जातात. दारूचा आलेला पैसा कधी सत्कर्म करत नाही तो अवैद्य, अनैतिक ठिकाणीच जातो. अजूनही आयुष्यात काहीच न पाहिलेली नुकतीच कॉलेजच्या जीवनात पाय ठेवणारी ही कोवळी मुले पालकांचा दुर्लक्ष आणि पोलिसांची दारूच्या व्यवसायात गुंतलेल्यांवर असणारी मेहेरनजर यामुळे व्यसनाधीन होऊन न समजणाऱ्या वयातच गुन्ह्यांमध्ये फसतात आणि आयुष्याची वाट लावून घेतात.
पॉम्पस हॉटेलसमोर बसणाऱ्या दारुवाल्यांचा बैठका, उभ्या असलेल्या महागड्या स्विफ्ट गाड्या या पर्यटकांच्या नसतात हे पोलिसांना माहिती नाही असं नाही, परंतु स्वतःचे हात बरबटलेले असल्याने अवैद्य दारू व्यावसायिकांवर दुर्लक्ष होतो आणि त्यातूनच मिळणाऱ्या पैशांच्या मस्तीमुळे अमानुष कृत्य करण्यासारखी प्रवृत्ती तरुण मुलांमध्ये जन्म घेते.
गुन्ह्याच्या तपासाच्या कौतुकास्पद कामगिरीबद्दल अभिनंदन स्वीकारण्याबरोबरच अवैद्य दारू व्यवसायात गुंतलेल्या धंदेवाल्यांचे पसरणारे जाळे, त्यात गुरफटणारी तरुणाई न रोखल्यामुळे होणारे गुन्हे यांचे अपयशही नक्कीच पोलिसांनी स्वीकारलं पाहिजे.
*क्रमशः*

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × five =