You are currently viewing स्वत:मधील गुण ओळखा आणि कर्तृत्‍व सिद्ध करा – अजय कांडर

स्वत:मधील गुण ओळखा आणि कर्तृत्‍व सिद्ध करा – अजय कांडर

कणकवली

करिअर निश्‍चिती करण्यापूर्वी प्रत्‍येकाने स्वतःतील गुण ओळखा आणि त्‍या गुणांच्या आधारे आपले कर्तृत्व सिद्ध करा असे आवाहन येथील कवी अजय कांडर यांनी केले.
तालुक्‍यातील वारगांव येथील शिक्षणमहर्षी शेठ म. वि. केसरकर यांच्या तेराव्या स्मृतीदिन कार्यक्रमाच्या औचित्‍यावर शेठ म. वि. केसरकर माध्यमिक विद्यालयाचा बक्षिस वितरण कार्यक्रम झाला. यात प्रमुख पाहुणे म्‍हणून बोलताना अजय कांडर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्था अध्यक्ष शांताराम (बबनशेठ) केसरकर, माजी सभापती रविंद्र जठार , वारगांव सरपंच नम्रता शेट्ये , उपसरपंच नारायण (नाना) शेट्ये , कार्याध्यक्ष विजय केसरकर , उपाध्यक्ष सदानंद काणकेकर, सचिव रमेश शेट्ये , खजिनदार सुनिल केसरकर, सदस्य सुधाकर नर , विश्वनाथ नर, जयवंत नर, संतोष पांचाळ, संतोष नर, माजी सरपंच प्रकाश नर, एकनाथ कोकाटे, रविंद्र केसरकर, मधुकर वळंजू, सुनिल कुळकर्णी, साळिस्ते सरपंच प्रभाकर ताम्हणकर, तंटामुक्ती अध्यक्ष राजेश जाधव, मुख्याध्यापक हनुमंत वाळके, माजी विद्यार्थी अतुल जाधव आदी उपस्थित होते.
स्वतः कडे एक जरी चांगला गुण असला तरी आपण कर्तृत्वाने मोठे व्हाल. तसेच चांगले गुरुजन मिळणे हे आपले भाग्य आहे असे मार्गदर्शन श्री.कांडर यांनी केले. प्रास्ताविक रमेश शेट्ये यांनी केले. स्वागत मुख्याध्यापक वाळके यांनी केले. सानिका वारीसे व ऐश्वर्या देसाई या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आडोलीकर यांनी तर आभार उपाध्यक्ष सदानंद काणकेकर यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

15 + eleven =