दोडामार्ग पंचायत समितीची मासिक सर्वसाधारण सभा ४ जून रोजी
विविध विभागांच्या योजनांचा होणार आढावा; आयत्या विषयांवरही चर्चा
दोडामार्ग
पंचायत समिती दोडामार्ग यांच्या मासिक सर्वसाधारण सभेचे आयोजन गुरुवार, दिनांक ४ जून २०२६ रोजी सकाळी ११ वाजता पंचायत समितीच्या स्वामी विवेकानंद सभागृहात करण्यात आले आहे. सदर सभेमध्ये विविध विभागांच्या योजनांचा आढावा घेण्यात येणार असून महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
सभेच्या प्रारंभी सदस्यांकडून आलेल्या रजा अर्जांवर विचार विनिमय करण्यात येणार आहे. तसेच दिनांक ७ एप्रिल २०२६ व ५ मे २०२६ रोजी झालेल्या पंचायत समितीच्या सर्वसाधारण सभेतील कार्यवृत्त कायम करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. मागील सभेत मंजूर करण्यात आलेल्या ठरावांवरील कार्यवाहीस मान्यता देण्याचाही विषय सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.
यावेळी शासनाचे महत्त्वाचे निर्णय व परिपत्रकांचे वाचन करण्यात येणार असून विविध विभागांच्या योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात येणार आहे. यामध्ये तालुका कृषी कार्यालय, वनक्षेत्रपाल, सार्वजनिक बांधकाम विभाग, लघुपाटबंधारे विभाग, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ, महाराष्ट्र राज्य वीज मंडळ, ग्रामपंचायत विभाग, पशुसंवर्धन विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, शिक्षण विभाग, पंचायत समिती कृषी विभाग, प्रधानमंत्री आवास योजना, मृदा व जलसंधारण उपविभाग (पाणलोट), एकात्मिक बाल विकास सेवा योजना, जिल्हा परिषद बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आदी विभागांचा समावेश आहे.
सभेच्या शेवटी सभापतींच्या मान्यतेने आयत्या वेळच्या विषयांवरही चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
