You are currently viewing फोंडा तालुका सावंतवाडी येथे वादळ सदृश्य परिस्थिती

फोंडा तालुका सावंतवाडी येथे वादळ सदृश्य परिस्थिती

जोरदार वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे आंबा काजू पिकांची प्रचंड हानी

फोंडाघाट तालुका कणकवली मध्ये पहाटेपासून वादळ सदृष्य परीस्थिती निर्माण झाली असून जोरदार वारे वाहण्याने आंबा तसेच काजू पिकांची प्रचंड घळ होत आहे. आंबा आणि काजू म्हणजे कोकणातील लोकांची जीवनदायीनी. अनेक कोकणी लोकांचे जीवन हे आंबा आणि काजू पिकातून येणाऱ्या उत्पन्नावर अवलंबून असते. अशावेळी आंबा बागायतदार वाहणाऱ्या वाऱ्यामुळे होणाऱ्या प्रचंड फळपीक गळतीमुळे चिंताग्रस्त झाले आहेत. त्यामुळे परिसरातील बागायतदार, शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटण्याची भीती आहे.
रात्री ९.०० वाजता सुरु झालेल्या वादळ सदृश्य वाऱ्याने प्रचंड हानी झाली आहे. ईलेक्ट्रीकच्या तारांमध्येही स्पार्किंग होत असल्याने वणवा पेटण्याची देखील शक्यता आहे. सर्वत्र पावसाळी वातावरण तयार झाले असून पहाटे ४.०० वाजेपर्यंत जवळपास १०० किलो मिटरच्या वेगाने वारे वाहत होते. त्यामुळे विद्युत पुरवठा देखील कित्येकदा खंडित झाला. रुंदीकरणासाठी काढलेले पत्रे पण देखील उडून गेले. त्यामुळे मोठी नैसर्गीक आपत्ती आली आहे. जुनी आंब्याची कलमे मुळातून उपटुन पडली. स्थानिक आमदार नितेशजी राणे साहेबांना परीस्थिती कळवणार असल्याची माहिती स्थानिक शेतकरी बांधवांनी दिली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा