You are currently viewing कुडाळमध्ये शिवसैनिकांकडून आ. वैभव नाईक यांचे जल्लोषात स्वागत

कुडाळमध्ये शिवसैनिकांकडून आ. वैभव नाईक यांचे जल्लोषात स्वागत

शिवसैनिकांकडून आ. वैभव नाईक यांच्यावर पुष्पवृष्टी

 

शिवसैनिकांचे जोरदार शक्तिप्रदर्शन

 

कुडाळ :

शिवसेनेचे निष्ठावंत आमदार वैभव नाईक यांचे कुडाळ येथे देखील शिवसैनिकांनी जल्लोषात स्वागत केले. शिवसेना झिंदाबाद, आवाज कोणाचा शिवसेनेचा, हिंदुहदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो, शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा विजय असो, आमदार वैभव नाईक तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजीने शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला. शिवसैनिकांच्या वतीने जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले.

मुंबईहून शुक्रवारी आ.नाईक कुडाळ येथे दाखल होताच, कुडाळ – मालवण शिवसेनेच्या वतीने त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले. शिवसैनिकांनी पक्षप्रमुख उध्दवजी ठाकरे व आ.वैभव नाईक यांच्या समर्थनार्थ रॅली काढली.

ढोलताशांचा गजर, फटाक्यांची आतषबाजी, फुलांचा वर्षाव आणि घोषणाबाजी करत, हातात भगवे झेंडे घेऊन जल्लोषी वातावरणात आ.वैभव नाईक यांचे स्वागत करण्यात आले.

 

 

 

याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, बबन शिंदे, कुडाळ तालुकाप्रमुख राजन नाईक, मालवण तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, युवासेना जिल्हाप्रमुख तथा उपनगराध्यक्ष मंदार शिरसाट, युवासेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक,मंदार केणी, यतीन खोत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख सौ.जान्हवी सावंत, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, अतुल बंगे, संतोष शिरसाट, रूपेश पावसकर, जयभारत पालव, सौ.श्रेया परब, माजी जि.प.सदस्या वर्षा कुडाळकर, नगरसेवक उदय मांजरेकर, किरण शिंदे, सचिन काळप, नगरसेविका सौ.सई काळप, सौ.श्रेया गवंडे, सौ.ज्योती जळवी, सौ.श्रुती वर्दम, तपस्वी मयेकर, महिला आघाडी तालुका संघटक सौ.स्नेहा दळवी, सौ.मथुरा राऊळ आदींसह कुडाळ-मालवण मतदारसंघातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

कुडाळ तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीने आ.वैभव नाईक यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. तालुकाध्यक्ष अभय शिरसाट, नगराध्यक्षा सौ.आफरीन करोल, जिल्हा बॅक संचालक विद्याप्रसाद बांदेकर व अन्य काँग्रेस पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

यावेळी आ.वैभव नाईक म्हणाले,आज तुम्हा सर्वांनी माझे मोठे स्वागत केले. मात्र मी स्वागत करण्याएवढे कोणतेही मोठे काम केले नाही. मी एवढेच केले की, शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी माझ्यावर निष्ठेने जो विश्वास दाखवला, ज्या निष्ठेने तुम्ही मला आमदार केले, त्याच निष्ठेने मी शिवसेना पक्षप्रमुख व तुमच्यासोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे.

मी कायमच तुमच्यासोबत राहणार आहे. जे आमदार बंडखोरी करून गेले ते निश्चितच पुन्हा शिवसेनेत येतील. सत्ता असो वा नसो, आमदार असो वा नसो मी मात्र एकनिष्ठतेने शिवसेनेसोबत सदैव राहणार आहे. मग माझ्यावर कोणताही प्रसंग येवो, तो झेलण्यास मी तयार आहे. त्यामुळे यापुढील काळात शिवसेना पक्षाला बळ व पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी तसेच राज्यात पुन्हा महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी सर्वांनी अधिक जोमाने काम करूया, असे आवाहन आमदार नाईक यांनी केले.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

16 + 17 =