You are currently viewing दोडामार्ग येथे शिवसेना सदस्य नोंदणी शुभारंभ…

दोडामार्ग येथे शिवसेना सदस्य नोंदणी शुभारंभ…

विशेष निरीक्षक डॉ. जयेंद्र परुळेकर यांची उपस्थिती

दोडामार्ग

दोडामार्ग तालुक्यातील शिवसेना सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ आज दोडामार्ग येथील शिवसेना कार्यालयात पक्ष तालुका निरीक्षक डाॅ जयेंद्र परुळेकर, तालुका प्रमुख बाबुराव धुरी, जिल्हा पदाधिकारी गणेश प्रसाद गवस,जिप सदस्या संपदा गवस, उपतालुकाप्रमुख संजय गवस,माजी नगराध्यक्ष सौ कुबल यांच्या प्रमुख उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज व हिंदू ह्रदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पार पडला.यावेळी अनेक तालुका कार्यकारिणी सदस्य, महिला सदस्य व युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दोडामार्ग तालुक्यातून तीनही जिल्हा परिषद मतदारसंघातून आणि शहरातून जास्तीत जास्त सदस्य नोंदणी व्हावी यासाठी कार्यरत होण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना या प्रसंगी बोलताना डॉ जयेंद्र परुळेकर यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा