You are currently viewing विलवडे गावात एस (आय) फाउंडेशन. आणि गामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावचा स्वच्छ गाव सुंदर गाव हरीत गाव माझा कचरा माझी जबाबदारी जनजागृती मोहीम सुरू.

विलवडे गावात एस (आय) फाउंडेशन. आणि गामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावचा स्वच्छ गाव सुंदर गाव हरीत गाव माझा कचरा माझी जबाबदारी जनजागृती मोहीम सुरू.

विलवडे गावात एस (आय) फाउंडेशन. आणि गामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने गावचा स्वच्छ गाव सुंदर गाव हरीत गाव माझा कचरा माझी जबाबदारी जनजागृती मोहीम सुरू.

नितेश दळवी

राज्य स्तरावर विविध नावलौकिक मिळवत असलेल्या एस. आर. दळवी फाउंडेशन आणि विलवडे गामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने विलवडे ह्या शेतीप्रधान गावात पर्यावरण संतुलनासाठी १६ते १८ जानेवारी असे तीन दिवस स्वच्छता व जनजागृती मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हात कुषी प्रधान असे नाव मिळवलेल्या विलवडे गावातील लोंकानी जिल्हात आदर्शवत ठरणाऱ्या स्वच्छतेचा मोहिमेत संपुर्ण विलवडे गावाने सहभागी दर्शवली आहे.
या मोहिमेत गावातील व नदीकाठावरील प्लास्टिकसह ओला व सुका कचरा तसेच विघटन न होऊ शकणाऱ्या वस्तु व धातु गोळा करण्यात आले आहेत. यावेळी स्वच्छता संदर्भात व टाकाऊ वस्तूपासुनटिकाऊ वस्तु करण्या बाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले त्यानंतर विलवडे वासीय व पर्यावरण संतुलनासाठी शपत घेण्यात आली.
विलवडे गावचे सुपुत्र रामचंद्र धर्माजी दळवी आणि त्याच्या पत्नी सीता दळवी यांनी राज्य स्तरीय कार्यक्षम असलेल्या एस. आर. दळवी. फाऊंडेशन मुंबईत स्थापना केली शिक्षक सक्षमीकरणहा मुख्य ध्यास डोळ्यासमोर ठेवुन स्थापना झालेली हि संस्था शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातही आघाडीवर आहे.
या विलवडे कूषी प्रधान गावात स्वच्छता व पर्यावरण रक्षण जनजागृती मोहिमेत सहभागी झालेल्या महिला व पुरुष युवकांचे संस्थापक सीता दळवी आणि रामचंद्र दळवी तसेच विलवडे संरपचं सदस्य यांनी आभार मानले..

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 + fourteen =