You are currently viewing कर्करोग प्रतिबंध नियंत्रणासाठी आरोग्य विभागांना प्रशिक्षण

कर्करोग प्रतिबंध नियंत्रणासाठी आरोग्य विभागांना प्रशिक्षण

लोकांना फायदा होण्याकरिता काम करणार आहे.

– सहसचिव सुषमा तायशेट्ये

सिंधुदुर्गनगरी 

 सिंधुदुर्ग जिल्ह्यात कर्करोग प्रतिबंध व नियंत्रणात आरोग्य विभाग सर्व स्तरावरील वैदयकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेऊन अधिकाधिक लोकांना याचा फायदा होण्याकरिता काम करणार आहे. त्याकरिता नजीकच्या जिल्ह्यातील कर्करोग रुग्णालयांची मदत घेतली जाणार आहे. जेणेकरून Affordable Cancer Care उपक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करता येईल असे DAE चे सहसचिव सुषमा तायशेट्ये (भा.प्र.से.) यांनी सांगितले.

                सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सार्वजनिक आरोग्य विभाग, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम अंतर्गत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्ग व टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने preventive oncology आरोग्य सेवा सुरु करण्याच्या उद्देशाने व किमोथेरपी डे केअर आरोग्य सेवा अधिक प्रमाणात कार्यान्वित करण्याकरिता CME कार्यशाळा आज दिनांक 7 जानेवारी रोजी शरद कृषी भवन सिंधुदुर्गनगरी येथे संपन्न झाला.

                 या  एकदिवसीय CME कार्यशाळेवेळी जिल्हाधिकारी, के. मंजुलक्ष्मी, टाटा मेमोरिअल सेंटर चे Academic संचालक, डॉ. श्रीपाद बनावली, डॉ. अतुल बुदुक, डॉ. अभय देसाई, डॉ. सुवर्णा गोरे, डॉ. राहुल सोनवणे, डॉ. अमय ओक, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीपाद पाटील, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदेश कांबळे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्याम पाटील, निवासी बाह्यसंपर्क अधिकारी डॉ. सुबोध इंगळे, CVHO WHO पुणे डॉ. तेजपाल चव्हाण, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक दयानंद कांबळी, जिल्हा लेखा व्यवस्थापक आत्माराम गावडे, जिल्हा आयुष अधिकारी डॉ.कृपा गावडे, जिल्हा कार्यक्रम समन्वयक एन.सी.डी. केतन कदम, जिल्हा कार्यक्रम समन्वयक एन.टी.सी.पी. संतोष खानविलकर, FLC अमित जगताप, जिल्हा समूह संघटक गोपाळ गोसावी, समाज कार्यकर्ता एन.टी.सी.पी. कामस अल्मेडा, DEO- एन.सी.डी. विभाग रमेश पंडीत, सर्व एन. पी. सी. डी. सी. एस. एन.पी.एच.सी.ई. एन.पी.पी.सी., डी.एम.एच.पी., एन.पी.सी.बी. विभागांतर्गत सर्व कर्मचारी व अधिपरिचारिका उपस्थित होत्या.

                राज्यातील कर्करोगाचे वाढते प्रमाण पाहता सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत राज्यात लोकसंख्येवर आधारित तपासणी कार्यक्रम राबविला जातो. त्यामध्ये ३० वर्षावरील सर्व स्त्रियांची स्तन कर्करोग व गर्भाशय मुख कर्करोगाच्या आणि तोंडाच्या कर्करोगाच्या प्राथमिक टप्प्यात निदनाकरिता तपासणी व जनजागृती केली जाते. सदर आरोग्य सेवा अधिक प्रभावीपणे राबविण्याकरिता टाटा मेमोरिअल रुग्णालयाच्या समन्वयाने सिंधुदुर्ग जिल्हयात राज्यस्तरीय अधिकाऱ्यांनी दिनांक 5 ते  7 जानेवारी 2023 कालावधीत भेट दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen + seven =