You are currently viewing दत्तजयंतीच्या आधी खड्डे बुजवा अन्यथा दत्तजयंती दिवशी खड्डयात वृक्षारोपण करण्याचा  युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचा इशारा

दत्तजयंतीच्या आधी खड्डे बुजवा अन्यथा दत्तजयंती दिवशी खड्डयात वृक्षारोपण करण्याचा युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांचा इशारा

माणगाव :

श्री क्षेत्र माणगावला दत्तजयंती निमित्त महाराष्ट्रातून व देशातून लाखो दत्तभक्त येत असतात. श्री क्षेत्र माणगाव ला येणाऱ्या रस्त्यांना खड्डे पडले आहेत. आकेरी माणगाव सार्वजनिक बांधकाम विभागाने आणि झाराप माणगाव जिल्हापरिषदने हे खड्डे बुजवावेत. वेळोवेळी दोन्ही विभागाला सांगून देखील अजूनपर्यंत खड्डे भरलेले नाहीत. त्यामुळे दत्तजयंतीच्या आधी खड्डे बुजवा अन्यथा दत्तजयंती दिवशी खड्डयात वृक्षारोपण करण्याचा इशारा युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी यांनी केला.

यादरम्यान कायदा सुवस्थेचा प्रश्न उदभवल्यास सार्वजनीक बांधकाम विभाग आणि जिल्हा परिषद बांधकाम विभाग त्यास जबाबदार राहील असे त्यांनी म्हटले.

प्रतिक्रिया व्यक्त करा