You are currently viewing कणकवली परबवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कणकवली परबवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कणकवली परबवाडी येथे सावित्रीबाई फुले जयंती साजरी

कणकवली परबवाडी दत्तकृपा अपार्टमेंट येथे माऊली वस्तीस्तर पोयेकरवाडी संघाच्या वतीने आज सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाच्या अध्यक्षा सौ.दिव्या साळगावकर व सचिव मंगल सावंत यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस हार घालुन कार्यक्रमाचे दिपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांच्यावर आधारीत कविता, ओव्या, समूहगीत, भाषणे अशा विविध प्रकारच्या गोष्टींचे सादरीकरण करण्यात आले.
यावेळी मयुरी सरंगले यांनी साकारलेली सावित्रीबाई फुले यांची वेशभुषा विशेष आकर्षण ठरली. लक्ष्मी गुरव, पुजा बिर्जे गुजर, सोनाली नारकर यांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्यावर आधारित मत व्यक्त केले. या अभिवादन कार्यक्रमाला संघाच्या अध्यक्षा दिव्या साळगावकर, सचिव मंगल सावंत, उपाध्यक्ष रुपाली पोयेकर, खजिनदार रोहिणी मल्ली, निता बागवे, लक्ष्मी गुरव, सरीता चव्हाण, संगिता सारंग, सुचिता सोनी, सोनाली नारकर, मयुरी सरंगले यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा