You are currently viewing शिरवल मुख्य रस्ता चव्हाण घाटी पहिल्याच पावसात वाहतुकीस धोकादायक – सुशांत दळवी

शिरवल मुख्य रस्ता चव्हाण घाटी पहिल्याच पावसात वाहतुकीस धोकादायक – सुशांत दळवी

कणकवली

शिरवल मुख्य रस्ता चव्हाण घाटी येथे पहिल्याच पावसात वाहतुकीस धोकादायक झाला आहे. काही दिवसापूर्वी सदर जिल्हा परिषद मालकीच्या रस्त्यावर डांबर ऐवजी मातीने खड्डे भरून डागडुजी करण्यात आली होती. तीच डागडुजी आता लोकांची डोकेदुखी झाली आहे. यासंदर्भात कणकवली पंचायत समितीत जिल्हा परिषद बांधकाम विभाग येथे मा.सुशांत दळवी ,अमोल सावंत, प्रशांत कुडतरकर, गुरू वंजारे आदी कार्यालयात जाऊन उपविभागीय अभियंता श्री.महाले साहेब यांच्याशी फोनवर रस्त्याच्या परिस्थितीची माहिती दिली. सदर ठिकाणी तीव्र उतार असल्याने वाहने घसरून अपघात होण्याची दाट शक्यता आहे तरी आपल्याकडून लवकरात लवकर तात्काळ रस्ता सुस्थितीत व्हावा अन्यथा शेवटी आम्हाला आमच्या पद्धतीने तो साफ करावा लागेल असे सांगितले. तसेच शाखा अभियंता श्री.कडुलकर रावसाहेब यांची प्रत्यक्ष भेट घेतली. त्यांनी लगेच तातडीने रस्त्यावरील माती काढून रस्ता पूर्ववत सुस्थितीत करुन देण्याची ग्वाही दिली.

प्रतिक्रिया व्यक्त करा