चिपी – परुळे व केळुस येथील भातशेती नुकसानीची प्रांत अधिकारी व तहसीलदारांनी केली पाहणी…

चिपी – परुळे व केळुस येथील भातशेती नुकसानीची प्रांत अधिकारी व तहसीलदारांनी केली पाहणी…

वेंगुर्ला :

अतिवृष्टीमुळे वेंगुर्ला तालुक्यातील ग्रामीण भागात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.दरम्यान आज बुधवारी प्रांत अधिकारी सुशांत खांडेकर व तहसीलदार प्रविण लोकरे यांनी चिपी,परुळे व केळुस गावात भेट देऊन पाहणी केली व त्वरित पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले.

यावेळी नुकसानग्रस्त शेतकरी महेश सावंत,शशिकांत तावडे,सूर्यकांत चव्हाण आदी तसेच परुळे येथील भातशेती नुकसानीची पाहणी केली.यावेळी तालुका कृषी अधिकारी हर्षा गुंड, चिपी ग्रामपंचायत सरपंच गणेश तारी, कृषी सहाययक सुरज परब,घोंगे, ग्रामसेवक मंगेश नाईक, ग्रामसेवक शरद शिंदे, तलाठी कुडतरकर,तलाठी गायकवाड,ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा