You are currently viewing सांगवे-कनेडी बाजारपेठेतील अवैध व्यवसाय बंद करा…!!

सांगवे-कनेडी बाजारपेठेतील अवैध व्यवसाय बंद करा…!!

बाजारपेठेत सीसीटीव्ही बसवा; शेकडो ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक श्री.धुमाळ यांची घेतली भेट…

कणकवली
सांगवे गावातील शेकडो ग्रामस्थांनी आज कणकवली पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांची भेट घेतली. सांगवे कनेडी बाजारातील अवैध धंदे बंद करा.दारू, पेट्रोल, गॅस सिलेंडरची बेकायदा विक्री करणाऱ्यावर कारवाई करा. सांगवे बाजारपेठ ही दशक्रोशीची बाजारपेठ असून याठिकाणी गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून त्रास दिला जात आहे. गाड्या अडविणे, धमक्या देणे असे प्रकार सुरू आहेत. त्यामुळे सांगवे-कनेडी बाजारपेठेत सी.सी.टी.व्ही.कॅमेरे बसवा अशी मागणी कणकवली पोलीस ठाण्यात निवेदने देऊन केली. सांगवे कनेडी बाजारात कनेडी येथील रहीवाशी लॉरेन डीसोजा हा आपल्या घरामध्ये राजरोश पणे आपल्या घरामधील गॅस सिलेंडरची खरेदी विक्रि तसेच गोवा बनावटीची दारू आणि मटका आपल्या घरामध्ये चालवत असतो. तसेच घरामध्ये पेट्रोल विक्रि चालू असते. सदर इसामाने कोणत्याही प्रकारची ग्रामपंचायतीची किंवा पुरवठा विभागाची परवानगी घेतलेली नाही. तो विकत असलेले पेट्रोल, दारू, मटका गॅस सिलेंडर या सर्व गोष्टीपासून बाजारातील लोकाना तसेच घराना धोका आहे. तरी त्याची खातेनिहाय चौकशी करून तातडीने चाललेली खरेदी विक्रि कायमची दोन दिवसात बंद करावी. अन्यथा आपल्या कार्यालयासमोर सांगवे ग्रामस्थ उपोषण करतील असे निवेदन पोलीस निरीक्षक कणकवली यांना दिले आहे. सांगवे कनेडी बाजारामध्ये गेली अनेक वर्ष गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून सातत्याने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातूनच कनेडी बाजारातील मोतेस याचा मृत्यू झालेला आहे . तसेच नाटळ खांदारवाडी येथील किशोर परब यालाही मारहाण झालेली आहे. हे लोक मोठया संख्येने एकत्र येऊन कोणालाही धमकावण्याचा व मारण्याचा प्रकार करत असतात. उदाहरणार्थ सांगवे सोसायटीचा जो प्रकार आहे. तो त्याच पद्धतीने घडलेला आहे . जनतेसमोर सत्य यावे व भविष्यात गुन्हे घडू नयेत म्हणून सी . सी.टी. व्ही. कॅमेरे बसवावेत . किंवा सी.सी.टी. व्ही. कॅमेरे बसविण्यास परवानगी द्यावी. ही बाजारपेठ दशक्रोशीची असल्यामुळे जनतेला कोणतीही भिती न बाळगता फिरण्याची धाडस होईल. तरी सी.सी.टी. व्ही. कॅमेरे बसवावेत अशा मागणीचे निवेदन दिले आहे. यावेळी माजी सभापती सुरेश सावंत, सांगवे सरपंच मयुरी मुंज, उपसरपंच प्रदीप सावंत, पंचायत समिती सदस्य स्मिता मालडीकर,माजी सरपंच महेश सावंत, विजय भोगटे, प्रफुल्ल काणेकर, रायमन घोणसालविस, सोसायटी चेअरमन कृष्णा वाळके, राजेश सापळे, धकु रेवडेकर, सुनील तोरोस्कर, पुंडलिक पवार,मधुकर गावकर, अनिल चिंदरकर, अजित सावंत, दीपक नांदगावकर, कुलदीप सावंत, प्रसाद सावंत, सुभाष सावंत, आदी सह शेकडोग्रामस्थ उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

nineteen − 11 =