You are currently viewing भात खरेदीवर शेतकऱ्यांना बोनस रक्कम देण्यात यावी

भात खरेदीवर शेतकऱ्यांना बोनस रक्कम देण्यात यावी

आमदार वैभव नाईक यांची मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भात खरेदीवर देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या भात खरेदीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत भाताची खरेदी देखील कमी होणार आहे. त्यामुळे पूर्वीप्रमाणे भात खरेदीवर शेतकऱ्यांना बोनस मिळावा अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

राज्य सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडून भात खरेदी करण्यात येत आहे ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी ३१ डिसेंबर ची मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना भात खरेदीवर देण्यात येणाऱ्या बोनसची रक्कम जाहीर न झाल्याने शेतकऱ्यांनी शासनाच्या भात खरेदीला प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत भाताची खरेदी कमी होणार आहे.याआधी शेतकऱ्यांना क्विंटल वर ५०० ते ७०० रु पर्यत शेतकऱ्यांना देण्यात आला होता. भात खरेदीवरील बोनसच्या रक्कमेचा शेतकऱयांना लाभ होत होता. परिणामी शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात वाढ केली होती. त्यामुळे शेतकऱ्यांना हा लाभ पुन्हा मिळवून देण्यासाठी भात खरेदीवर बोनस पुन्हा सुरु करून रक्कम जाहीर करावी.व ऑनलाईन शेतकरी नोंदणीसाठी अजून मुदत वाढ देण्यात यावी अशी मागणी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

sixteen + nine =