You are currently viewing आ. वैभव नाईक यांनी माणगाव येथील पूरस्थितीची केली पाहणी

आ. वैभव नाईक यांनी माणगाव येथील पूरस्थितीची केली पाहणी

*नदीत वाहून मृत्यू झालेल्या विठ्ठल कोळेकर यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देण्याचे दिले आश्वासन*

 

कुडाळ :

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे कुडाळ तालुक्यातील माणगाव येथे उद्भवलेल्या पूरस्थितीची आमदार वैभव नाईक यांनी तहसीलदार अमोल पाठक यांच्यासमवेत आज पाहणी केली.

यावेळी आवश्यक सूचना तहसीलदारांना देण्यात आल्या. महादेवाचे केरवडे येथील विठ्ठल कोळेकर यांचा पुराच्या पाण्यात वाहून मृत्यू झाला आहे. त्यांच्या निवासस्थानी आ. वैभव नाईक यांनी भेट देऊन कुटुंबियांना धीर देत सांत्वन केले. तसेच शासनाच्या माध्यमातून ४ लाख रु. ची मदत लवकरात लवकर मिळवून देण्याचे आश्वासन आ.वैभव नाईक यांनी दिले.

यावेळी माजी जि. प.सदस्य राजू कविटकर, कुडाळ शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी, माणगाव उपसरपंच दत्ता कोरगावकर, माणगाव व्यापारी संघटनेचे सचिव नाना बोगार, पोलीस पाटील श्री. कोलतेकर, तलाठी -शेणई, सर्कल -नार्वेकर, संग्राम जोगळे, आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा