You are currently viewing महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा २३ जानेवारीला..

महाराष्ट्र प्रज्ञाशोध परीक्षा २३ जानेवारीला..

गेल्या १८ एप्रिल रोजी होणारी इयत्ता आठवी, नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षा २३ जानेवारी रोजी सकाळी अकरा ते दोन या वेळात होणार आहे. ही परीक्षा करोना संकटामुळे होऊ शकली नाही.

विद्यार्थ्यांनी २०१९-२० या शैक्षणिक वर्षांत ज्या इयत्तेसाठी अर्ज भरला आहे. त्याच इयत्तेसाठी ते परीक्षेला बसतील. परीक्षा केंद्र, परीक्षा क्रमांक ही माहिती १५ जानेवारीनंतर www.mtsexam.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सर्व संबंधित शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांनी त्याची नोंद घ्यावी. करोना संकटामुळे परीक्षा घेण्यास झालेल्या उशिरास सर्वानी सहकार्य करावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रज्ञा शोध परीक्षेचे संचालक डॉ. एस. एम. घाटे यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

twelve + nineteen =