You are currently viewing बाल शिवाजी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

बाल शिवाजी इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन जल्लोषात

कोकण संस्कृती” विषयावर विद्यार्थ्यांनी केले सादरीकरण

कणकवली

जानवली येथील अनिरुद्ध शिक्षण प्रसारक संस्था मुंबई संचलित बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन शाळेच्या मैदानावर उत्साहात संपन्न झाला.

“कोकण संस्कृती” या विषयावर विविध नृत्याविष्कार नर्सरी ते इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेे. त्याचबरोबर कोकण संस्कृतीची ओळख करून देणारा, कोकणातील प्रत्येक जिल्ह्याची माहिती करून देणाऱ्या चलचित्रपटाचे सादरीकरण करण्यात आले. विद्यार्थ्यांनी प्रस्तुत केलेलं ‘दशावतारी नाटक’ हे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरले तसेच शाळेतील राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्तरावर यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.
शिक्षणाबरोबरच मुलांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी बाल शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल विविध कार्यक्रम आयोजित करते यातील वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन डॉक्टर तन्वीर अब्दुल मजीद यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. तसेच संस्थेचे अध्यक्ष ब्रिगे. सुधीर सावंत, वरिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी
कैलास राऊत, पत्रकार संतोष राऊळ , संस्थेच्या सचिव सुलेखा राणे, खजिनदार रमेश राणे, संस्थेचे सदस्य संदीप सावंत, अभिजीत सावंत, अनिश देशमुख, कैलास तावडे, विनायक सापळे, बलराम उईके, शैक्षणिक उत्कृष्टता संचालक प्रणाली सावंत, शिक्षक -पालक संघटनेचे उपाध्यक्ष कल्पेश महाडेश्वर, सहसचिव वैशाली पवार, प्रशालेचे मुख्याध्यापक कृष्णा जाधव, शैक्षणिक समन्वयक महेश पाटील, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. अश्विनी जाधव, सौ.श्वेता मिसाळ, सौ.वर्षा मेस्त्री, मृणाल मिठारी यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा