You are currently viewing येत्या दहा दिवसांत चिपी विमानतळ सुरु

येत्या दहा दिवसांत चिपी विमानतळ सुरु

केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री सिंदिया यांचे खा राऊत यांना आश्वसन;गटनेते नागेंद्र परब यांची माहिती

.कुडाळ ता 21 चिपी विमानतळ सुरू होण्याबाबत येत्या आठ ते दहा दिवसात रिझल्ट देतो असे आश्वासन केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री श्री. ज्योतीरादित्य सिंदिया यांनी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार श्री. विनायक राऊत यांना दिले अशी माहिती जिल्हा परिषद शिवसेना गटनेते नागेंद्र परब यांनी दिली. श्री परब म्हणाले शुक्रवार ९ जुलै २०२१ रोजी खासदार श्री. विनायक राऊत यांनी चिपी विमानतळाच्या कामाची पहाणी करुन संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतल्यानंतर असे निदर्शनास आले की, विमानतळ सुरु करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व कामे पुर्ण असून त्यात कोणत्याही त्रुटी शिल्लक राहिलेल्या नाहीत. तसेच २८ जून २०२१ रोजी आय आर बी कंपनीने नागरी हवाई वाहतूक संचलनालयाला त्या संदर्भातील अॅक्शन टेकन रिपोर्ट सबमिट करुन 4C VFR ऐरोड्रोम लायसन्स मिळणेसाठी विनंती केलेली आहे. त्यामुळे विमानतळ संपूर्णपणे पूर्ण झाल्याची खात्री झाल्यानंतर तो सुरु करण्यासाठी आवश्यक असलेल्या परवानगीला चालना देण्यासाठी खासदार श्री. विनायक राऊत यांनी दि. १३ जुलै २०२१ रोजी दिल्ली येथे नागरी हवाई वाहतुक मंत्री श्री. ज्योतीरादित्य सिंदिया यांची भेट घेवून त्यांना चिपी विमानतळाची नागरी हवाई वाहतूक संचलनालय (DGCA) ची पहाणी होवून लवकरात लवकर चिपी विमानतळ सुरु करण्यासाठी आवश्यक परवानगी मिळावी अशी विनंती केली आहे.

यावेळी केंद्रिय नागरी हवाई वाहतूक मंत्री सिंदिया यांनी याबाबत आपण विशेष लक्ष घालून ८ ते १० दिवसांत आपणांस रिझल्ट देतो असे आश्वासन दिले आहे. त्यामुळे चिपी विमानतळावरुन लवकरच विमानसेवा सुरु होईल असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला आहे. अशी माहिती शिवसेना गटनेते मा. श्री. नागेंद्र परब यांनी दिली आहे. दिल्ली चिपी विमानतळ सुरू होण्याबाबत येत्या आठ ते दहा दिवसात रिझल्ट देतो असे आश्वासन केंद्रिय हवाई वाहतूक मंत्री श्री. ज्योतीरादित्य सिंदिया यांनी शिवसेना लोकसभा गटनेते खासदार श्री. विनायक राऊत यांना दिले

प्रतिक्रिया व्यक्त करा

9 + 7 =