You are currently viewing शिव छत्रपती

शिव छत्रपती

*राजे श्री शिवछत्रपती राज्यस्तरीय स्पर्धा काव्यकरंडक सर्वोत्कृष्ट क्रमांक प्राप्त कवयित्री सौ.प्रतिभा फणसळकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

 

विषय:-‘शिव छत्रपती’

” छत्रपती शिवाजी महाराज की जय”

जिजाऊचे स्वराज्याचे स्वप्न,पुर्ण शिवराज्याभिषेकाने

महाराष्ट्र धर्म रक्षिला, पावन रायगड

शिवस्पर्शाने

“श्रीमंतयोगी,शककर्ता,जाणताराजा,” समर्थ बोलले कौतुकाने

” शिवाजी छत्रपतीराजा झाला,” डंका पिटला रयतेने ।।१।।

 

पाठिशी शूरवीर,एकनिष्ठ जिवलग,

लढवय्ये मावळे शिलेदार

सह्याद्रीचे बुलंद कडे, गडकिल्ले,गर्द झाडी,हे मुक साथीदार

जर अंमल गडांवर,स्वातंत्र्य अबाधित मुलखावर नजर,

सेनापती,अष्टप्रधान मंडळ करती चोख राज्य कारभार ।।२।।

 

महाराष्ट्रात,पाच बलाढ्य सल्तनतीचा, अंमल पाशवी क्रुर

खून,बलात्कार,जनता निराधार,शत्रु झाला शिरजोर

गमिनीकाव्याने लढले शूरवीर मावळे मुठभर

शत्रू म्हणती,गेला कुठे? हा शिवाजी डोंगरातील उंदीर ।।३।।

 

होता जीवा म्हणून वाचला शिवा, अफजलखान भेटीत

पस्तावला शाहिस्तेखान,शिवबाने बोटे उडविली लालकिल्यात

पिता-पुत्रांचे पेटाऱ्यातून पलायन आग्राभेटीत

अब्रू गेली,औरंगजेबाची,शिवराय,

शंभूला टाकून कैदेत ।।४ ।।

 

तानाजी गेला,कोंढाणा जिंकला, शेलार मामाने

प्राणाची पर्वा नाही ,विशाळगडाची खिंड रोखली बाजीप्रभूने

शिवा काशिद बनला प्रतिशिवाजी, गाठले साक्षात मृत्यूने

पुरंदरावर राजासाठी,हत्तीशी कडवी झुंज दिली येसाजीने ।।५।।

 

जुन्नर,सुरत लुटली, दर्यात दुर्ग बांधले, डंका चारी मुलखात

यशाचे गमक होते,अखंड सावधानता, गनिमीकावा,व झुंजार वृत्तीत

धडकी भरली होती ‘शिवाजी’नावाची पाची शत्रुच्या उरात

३५०वर्षे झाली तरी शिवराया भारताचे

आदर्श आराध्यदैवत।।६।।

 

गुरू दादोजी युद्धनीती शिक्षक, जिजाऊचे संस्कार

सर्वधर्मसमभाव,परस्त्री मातेसमान रयतेचा पालक,प्रशासक

अखंड स्वराज्याचा ध्यास,हेच जन्म मरणातील अंतर

गुणवंत,यशवंत,बुद्धीवंत,नीतीवंत राजाचे जगाला कौतुक ।। ७।।

 

छत्रपती शिवराजाने,जगदंब म्हणून सोडला शेवटचा श्वास

स्वराज्य काबीज करण्या दक्षिणेत आला औरंगजेब खास

राजांची पुण्याई थोर,काळाने त्याचाच घेतला घास

शिवशाहीचे वैभव टिकले हि तो श्रींची इच्छा’ व मराठ्यांचा ध्यास ।।८।।

 

*प्रतिभा फणसळकर*

प्रतिक्रिया व्यक्त करा