You are currently viewing बिडवलकर खून प्रकरणी चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

बिडवलकर खून प्रकरणी चारही आरोपींना न्यायालयीन कोठडी

सिद्धेश शिरसाटला डिस्चार्ज दिल्याने त्याची रवानगी सावंतवाडीच्या कारागृहात

कुडाळ :

सिंधुदुर्गमधील सिद्धिविनायक उर्फ प्रकाश बिडवलकर खून प्रकरणामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी रोज नवनवीन खुलासे होत आहे. अशातच पोलिसांना या प्रकरणा आणखी आरोपी असल्याचा संशय आहे. एवढंच नाहीतर आरोपी सिद्धेश शिरसाट याचा मोबाईलही अजूनही बेपत्ता असल्याचं समोर आलं आहे. तसंच या प्रकरणात मारेकऱ्यांनी दोन गाड्या वापरल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

प्रकाश बिडवलकर खून प्रकरणामध्ये वापर झालेल्या दोन वाहनांपैकी संशयितांनी प्रकाश बिडवलकरचा मृतदेह कुडाळहुन सातार्डाला नेताना वापरलेले वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या वाहनाच्या मालकाची कसून चौकशी पोलिसांनी केली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.

दरम्यान, यातील पोलीस तपासात वेगवेगळे विषय समोर येत आहेत. यात प्रकाश बिडवलकर याचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी एकूण दोन गाड्यांचा वापर करण्यात आला होता. यातील एक इर्टिका गाडी पोलिसांनी सोमवारी जप्त केली आहे. ही इर्टिका गाडी कुडाळ बाजारपेठ येथील इम्रान ईस्मान शेख याची असल्याचे स्पष्ट झाले आहे. संशयित आरोपी क्रमांक एक सिद्धेश शिरसाट याच्याच सांगण्यावरून इम्रान शेख याने ही गाडी दिली होती. गाडी नेताना कशासाठी हे कारण सांगितले नव्हते. तसेच ही गाडी विना चालक या तत्वावर दिली होती. त्यामुळे या गाडीचा वापर सिध्देशने कशासाठी केला ? याची इम्रान शेख यांना कोणतीच कल्पना शेवटपर्यंत दिली नाही. यासाठी २ हजार २०० रू भाडे इम्रान शेख यांना दिले होते. दरम्यान यातील दुसऱ्या गाडीचा शोध पोलीस घेत आहेत.

गणेश कृष्णा नार्वेकर आणि सर्वेश भास्कर केरकर या दोघांना पोलिसांनी अटक केली होती. कोठडी संपल्यामुळे दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी दिली आहे. आधीच न्यायालयीन कोठडीत असलेल्या सिद्धेश अशोक शिरसाट आणि अमोल श्रीरंग शिरसाट या दोन अशा एकूण चारही संशयितांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश कुडाळ न्यायालयाने दिले आहेत. सिद्धेश अशोक शिरसाट आणि अमोल श्रीरंग शिरसाट यांना २४ एप्रिलपर्यंत तर मंगेश कृष्णा नार्वेकर आणि सर्वेश भास्कर सर्वेकर यांना २८ एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी मिळाली आहे. संशयित आरोपी सिद्धेश शिरसाट हा आजारी असल्याने कोल्हापूर येथे ऍडमिट होता, त्याला आज डिस्चार्ज दिल्याने त्याची रवानगी सावंतवाडीच्या कारागृहात होणार आहे.

या खून प्रकरणाचा सर्वच तपास चारच संशयितांभोवती घुटमळला आहे. यामध्ये पोलिसांनी यात अजून आरोपी असण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपी क्रमांक सिद्धेश शिरसाट याच्यावर कोल्हापूर येथे उपचार सुरू होते. त्याला आजच डिस्चार्ज मिळाला असून त्याला सावंतवाडी येथील कारागृहात हलविण्यात येणार आहे. तसेच सिध्देश शिरसाटचा मोबाईल अद्याप प्राप्त झालेला नसल्याची माहिती तपासी अधिकारी भीमसेन गायकवाड यांनी सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा