You are currently viewing चल जाणूया नदीला’ अभियानांतर्गत तांत्रिक अहवाल तयार करा

चल जाणूया नदीला’ अभियानांतर्गत तांत्रिक अहवाल तयार करा

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी

सिंधुदुर्गनगरी

‘चल* *जाणूया नदीला’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील केडशी नदीचा समावेश झालेला आहे. या नदी बाबत संबंधित विभागाच्या मदतीने तांत्रिक अहवाल तयार करावा, अशी सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मीय यांनी दिली.

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवांतर्गत चल जाणूया नदीला या अभियानाची आज बैठक झाली. पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता गोविंद श्रीमंगले यांनी संगणकीय सादरीकरण केले. अधीक्षक अभियंता विजय थोरात यांनीही कृती आराखड्याबाबत सविस्तर माहिती दिली.

जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी् म्हयणाल्याक, केडशी नदीच्या काठावर असणाऱ्या मोरगाव, पडवे माजगाव, आडाळी, डिंगणे, डोंगरपाल नेतर्डे या सहा गावांमधील लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी शाळेचे मुख्याध्यापक यांचा समावेश करून उपसमिती तयार करा. संबंधित विभागांच्या मदतीने अहवाल तयार करा, त्याबाबत चर्चासत्र व आवश्यक कामांचे नियोजन करा.
याबैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर, उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी.एस दिवेकर, उपविभागीय जल संधारण अधिकारी भूषण नार्वेकर, छोटे पाटबंधारे कार्यकारी अभियंता उदय महाजनी, प्राथकमिक शिक्षणधिकारी महेश धोत्रे, दोडामार्गचे गटविकास अधिकारी वासुदेव नाईक, केडशी नदी समन्वयक जयेश सावंत, डिंगणे गावाचे सरपंच संजय डिंगणेकर आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा