पतीच्या रागातून नवविवाहीतेची आंबोली घाटात उडी…

पतीच्या रागातून नवविवाहीतेची आंबोली घाटात उडी…

अंगावर जखमा; शिरोड्यातून त्याठिकाणी गेल्यानंतर आत्महत्येचा विचार आल्याची दिली कबूली…

आंबोली

येथिल आंबोली घाटाच्या खोल दरीत उडी घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणार्‍या  नवविवाहीतेची ओळख अखेर पटली.कमल रामनाथ इंडे (२५), असे तीचे नाव आहे. पती बरोबर झालेल्या भांडणाचा राग मनात ठेवून आपण हा टोकाचा निर्णय घेतला, अशी कबूली तीने पोलिसांना दिली आहे.

दरम्यान दरीत पडल्यामुळे तिच्या अंगावर जखमा झाल्या आहेत. तसेच एक पाय फॅक्चर आहे. त्यामुळे तीला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रग्णालयात पाठविण्यात आल्याचे पोलिस निरिक्षक सचिन हुंदलेकर यांनी सांगितले.

ती मुळची अहमदनगर येथिल असून आपल्या पतीसह शिरोडा येथे राहते. दरम्यान सकाळी पती सोबत भांडण झाले होत. त्यामुळे आपण रागाने गावाकडे जाण्यासाठी एसटीने घराबाहेर पडले. मात्र आंबोलीत गेल्यानंतर आपल्या मनात आत्महत्येचा विचार आला आणि हा प्रकार आपण केला, असे तिने पोलिसांना सांगितले.

प्रतिक्रिया व्यक्त करा