You are currently viewing वैभववाडी दोन दिवसांत नवीन सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण….

वैभववाडी दोन दिवसांत नवीन सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण….

एकुण रुग्ण संख्या १२२ वर; सक्रिय रुग्ण १४…

वैभववाडी प्रतिनिधी :

तळकोकणात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहे. वैभववाडी तालुक्‍यात दोन दिवसांत नवीन सहा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १२२ झाली आहे. त्यापैकी १४ रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर सांगुळवाडी कोव्हीड कक्ष व जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. १०४ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ४ रुग्ण कोरोनाचे बळी ठरले आहेत. सोमवारी आढळून आलेल्या रुग्णांमध्ये एडगांव ५, ऐनारी येथे १ यांचा समावेश आहे. अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. उमेश पाटील यांनी दिली आहे.
कोणीही आजाराकडे दुर्लक्ष करू नये. प्रत्येकाने स्वतःच्या आजाराची काळजी घ्यावी. सर्दी, ताप, खोकला अशी लक्षणे आढळल्यास त्वरित आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा. असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

five × three =