You are currently viewing खोटे विश्व्

खोटे विश्व्

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य लेखक कवी श्रीकांत वडकुते लिखित अप्रतिम काव्यरचना*

*खोटे विश्व्*

समोरासमोर चांगले
बोलणं अगदी खोटं
दुसऱ्याची वाह वा
करणं खरंच खोटं

आज काल नाती
ही खोटी असतात
आपण कितीही केल
दोष आपल्या देतात

कोठेही जा सगळीकडे
आपलाच मी मोठेपणा
कितीही खरं बोललं
दाखवतात उदारपणा

खोटी माणसं खोटं बोलणं
सगळ्यांना माहित आहे
कितीही आपण जीव लावला
तरी खोटं बोलणारच आहे

खोटे मोठेपणा खोटा आळ
मी मनाचा मोठा शहाणपणा
फसवी आहे ही जगदुनिया
वागावे आपण माणसापणा

सगळीकडे खोट्याचीच
खोट्यालाच इथे भाव
कितीही खरेपणाने वागा
तरी सत्याला नाही वाव

श्रीकांत वडकुते
रा. बाभुळगाव
जिल्हा. हिंगोली.

 

 

प्रतिक्रिया व्यक्त करा