You are currently viewing आचरा कॉलेज मुलांना माजी खा.निलेश राणे यांच्याकडून मदतीचा हात

आचरा कॉलेज मुलांना माजी खा.निलेश राणे यांच्याकडून मदतीचा हात

१६ डिसेंबरला दिल्ली येथे वंदे भारतरम कार्यक्रमात होणार सहभागी

मालवण

दिल्ली येथे १६ डिसेंबरला सादर होणा-या वंदे भारतरम कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी जाणा-या आचरा कॉलेजच्या मुलांना माजी खा निलेश राणे यांच्या कडून आर्थिक मदत देण्यात आली. तीचे वितरण भाजप मालवण तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांच्या हस्ते केले गेले.यावेळी त्यांच्या सोबत विजय कदम तसेच आचरा कॉलेज डान्स गृपच्या हर्षाली लाड, स्नेहल देसाई, तनुजा देसाई, मयुरी मुणगेकर, साक्षी लाड, करीना खराडे, गौरव लाड, हर्षद मेस्त्री, रितेश गोलातकर आदी उपस्थित होते.

मुंबई विद्यापीठ राज्यस्तरीय युवा महोत्सवात यश संपादन केलेल्या आचरा कॉलेजच्या समई नृत्य डान्स गृपला २६ जानेवारीला राजपथ संचलनात सादर होणा-या वंदे भारतम कार्यक्रमाच्या निवड चाचणी साठी तीन फे-यांमधून निवड केली जाणार आहे.यातून निवड होणा-या गृपला राजपथ संचलनात सहभागी होता येणार आहे.यादृष्टीने मुंबई, नागपूर नंतर आता सोळा डिसेंबरला दिल्ली येथील अंतिम फेरी साठी आचरा कॉलेज गृप जाणार आहे. याबाबत माहिती मिळताच माजी खा निलेश राणे यांच्याकडून त्यांना आर्थिक मदत देण्यात आली. त्यांच्या या सहकार्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांकडून धन्यवाद व्यक्त केले जात आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

seventeen − 11 =